प्रतिनिधी
पुणे : मराठी चॅनेल मधल्या मुली साड्या का नाही नेसत??, त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात??, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पिंपरीत मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. याच कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले आवडते पंतप्रधान आहेत. त्यांनी काही चांगली कामे केली आहेत, अशी स्तुतीसुमने उधळली. Why don’t girls in Marathi channels wear sarees
पण या कार्यक्रमातले सुप्रिया सुळे यांचे एक वेगळे वक्तव्य व्हायरल होत आहे. या वक्तव्यात त्या म्हणतात, “चॅनेल मधल्या मुली साड्या का नाही नेसत??, त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात??, तुम्ही मराठी बोलता ना… मग मराठी संस्कृतीसारखे कपडे का नाही घालत??, आपण सगळ्या गोष्टींचे वेस्टर्नाझेशन का केले आहे??, असे सवाल सुप्रिया सुळे यांनी केले आहेत. सुप्रिया सुळे यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी त्यावर कोणी अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.
भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह
काहीच दिवसांपूर्वी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी एका चॅनलच्या रिपोर्टरला, “तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलतो,” असे वक्तव्य केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात मोठा गदारोळ केला होता. भिडे गुरुजींचा व्यक्ती स्वातंत्र्याला आणि महिला स्वातंत्र्यला विरोध असल्याचा कांगावा देखील अनेकांनी केला होता.
मात्र, आज सुप्रिया सुळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरीतल्या कार्यक्रमात चॅनेलच्या पत्रकार मुलींना मराठी संस्कृतीचे पालन का नाही करत??, त्या साडी का नाही नेसत??, त्या शर्ट आणि ट्राउझर का घालतात??, आपण सगळ्या गोष्टींचे वेस्टर्नाझेशन का केले आहे??, असे सवाल केले. या मुद्द्यावरून मात्र अद्याप कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया आलेली दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App