विशेष प्रतिनिधी
मुंबई / नवी दिल्ली : संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितला एकनाथ शिंदेंच्या शपथविधीचा किस्सा, पण अजूनही कार्पेट खाली झाकून ठेवला स्वपक्षांचा धुव्वा!! Sanjay Raut and Supriya Sule
एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी वर खासदार संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत भाष्य केले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदेंना वगळून पुढे जा, असा संदेश प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना दिला होता, असा दावा राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नसती तर भाजपचे काही बिघडणार नव्हते पण एकनाथ शिंदेंनी घाबरून शेवटी शपथ घेतली, असे संजय राऊत म्हणाले.Sanjay Raut and Supriya Sule
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकट जवळपास निम्मे केंद्रीय मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असताना आपण मात्र लोकसभेच्या अधिवेशनात व्यग्र होतो म्हणून शपथविधीला जाऊ शकले नाही, अशी मखलाशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्याचबरोबर व्हॉट्सअप वर फिरलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दोघांचीच नावे होती. तिसऱ्याचे नावच नव्हते, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला, वर पण ती निमंत्रण पत्रिका अधिकृत होती का हे माहिती नाही, अशी मखलाशी देखील त्यांनी केली.Sanjay Raut and Supriya Sule
CM फडणवीस म्हणाले- विरोधकांना माफी, हाच माझा बदला, माझी खलनायकासारखी प्रतिमा तयार केली, सर्व विसरून पुढे जाणार
महायुतीच्या घरात घडलेल्या घडामोडींकडे संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी असे डोकावून पाहिले. पण विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांचा धुव्वा का उडाला??, याबद्दल मात्र त्यांनी कुठले भाष्य केले नाही. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम्ही आत्मपरीक्षण करू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
त्यानंतर राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेऊन नंतर पत्रकार परिषद घेतली होती. शरद पवारांनी पक्षीय कार्यक्रमाची आखणी देखील केली होती. पक्षाचे जिल्हास्तरीय मेळावे घेण्याचे ठरविले होते, पण प्रत्यक्षात ते मेळावे अजून कुठे सुरू झालेले दिसले नाहीत. त्यावर सुप्रिया सुळे यांनी कुठले भाष्य केले नाही.
पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी 20 आमदारांची एक बैठक घेतली त्याचबरोबर महापालिका निवडणुका जवळ आल्यात त्याची तयारी करा, असे आदेश आपल्या शिवसैनिकांना काढले. पण त्या पलीकडे शिवसेनेतून देखील कुठल्या राजकीय हालचाली दिसल्या नाहीत. त्यावर संजय राऊत यांनी कुठले भाष्य केले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App