Abhishek Manu Singhvi : काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या राज्यसभा सीटवर नोटांचे बंडल; सदनात खळबळ; चौकशी आणि तपास सुरू!!

Abhishek Manu Singhvi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Abhishek Manu Singhvi नव्या संसदेत प्रेक्षक गॅलरीतून पुढे टाकण्याचा प्रकार घडून साधारण वर्षभरच उलटून गेले नाही, तोच राज्यसभेत आज एक नवीन प्रकार घडला. काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या राज्यसभा सीटवर नोटांचे बंडल आढळले. त्यामुळे राज्यसभेत प्रचंड खळबळ माजली राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब चौकशी आणि तपासाचे आदेश दिले.Abhishek Manu Singhvi

राज्यसभा सुरू होण्यापूर्वी जे सिक्युरिटी चेकअप असते, ते सुरू असताना सुरक्षा अधिकाऱ्यांना राज्यसभा सीट नंबर 222 वर करन्सी नोटांचे बंडल आढळले ते त्यांनी ताबडतोब राज्यसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लगेच ओळखून या संदर्भात चौकशी आणि तपास असे आदेश दिले राज्यसभेची कार्यवाही सुरू असताना स्वतः धनखड यांनी ही माहि ती सदनामध्ये दिली त्यामुळे सदस्यांमध्ये मोठी खळबळ माजली.



राज्यसभेचे नेते जगत प्रकाश नड्डा यांनी देखील या संदर्भात सभापतींनी दिलेल्या आदेशाचे स्वागत केले. ही घटना अत्यंत गंभीर असून केवळ सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातल्या वादापुरती मर्यादित नाही, तर राज्यसभा आणि संसद यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे त्यामुळे आपण दिलेले चौकशी आणि तपासाचे आदेश योग्य आहेत, असा निर्वाळा नड्डा यांनी दिला. त्यानंतर राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी तसेच लोकसभेच्या अनेक सदस्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. स्वतः अभिषेक मनू सिंघवी त्यावेळी संसदेच्या कॅन्टीनमध्ये होते.

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी कॅश

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी कॅश हा विषय 2019 पूर्वी गाजलाच होता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी अदानी विरोधात प्रश्न विचारण्यासाठी कॅश घेतल्याचा आरोप झाला होता त्या संदर्भात अनेक व्हिडिओ कागदपत्रे माध्यमे आणि सोशल मीडियात फिरत होती त्या संदर्भात चौकशी देखील सुरू आहे. कोर्ट केस अद्याप प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदनात एका खासदाराच्या सीटवर थेट नोटांचे बंडल आढळल्याने “प्रश्न विचारण्यासाठी कॅश” हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Congress MP Abhishek Manu Singhvi’s Rajya Sabha seat with a bundle of notes; Excitement in the House; Inquiry and investigation on!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात