विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis आता इथून पुढे टेस्ट मॅच आहे अशा शब्दांमध्ये नवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू करताना सरकारी अधिकारी मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपले विरोधक यांना इशारा दिला. त्याचवेळी आमची कसोटी सरकारची गती दिशा आणि समन्वय राखण्याची असून आम्ही ती स्थिर सरकार द्वारे पूर्ण करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत दिली. Devendra Fadnavis new cm of maharashtra test match
एकनाथ शिंदे आणि माझे रोल जरी आता बदलले असले तरी आमच्या कामाची दिशा आणि गती तीच राहील किंबहुना अधिक वाढेल, असे फडणवीस म्हणाले.
प्रचंड मोठ्या मॅन्डेड सह फडणवीसांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या समवेत एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर ताबडतोब तिघांनी मंत्रालयात जाऊन आपापल्या पदांचा कार्यभार स्वीकारला. Devendra Fadnavis
Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पार्थ चॅटर्जी भ्रष्ट व्यक्ती, स्वत:ला इतर आरोपींसारखे म्हणताना लाज वाटली पाहिजे
त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारचा रोड मॅप सादर केला त्यामध्ये लाडकी बहिणी योजना सरकारची आर्थिक शिस्त यापासून विरोधकांशी समन्वय या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. जुन्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मूल्यमापन करून नवीन मंत्रिमंडळाची रचना करू, असे आश्वासन त्यांनी दिले. Devendra Fadnavis
लाडकी बहीण योजना सुरूच ठेवू. ज्या महिला निकषाबाहेरच्या असतील, त्यांच्याबद्दल निर्णय घेऊ. पण योजना सुरूच ठेवू. त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रूपये देऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
8, 9 आणि 10 डिसेंबरला मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन बोलवून विधानसभा अध्यक्ष निवड आणि राज्यपालांचे अभिभाषण अशी शिफारस फडणवीस मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली.
विरोधक संख्येने कमी असले, तरी त्यांना योग्य सन्मान देऊन त्यांनी विधिमंडळात मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर उहापोह करून निर्णय घेऊ, असे फडणवीस म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App