सनातन धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्यांना सनातन शब्दाचा अर्थ तरी समजतो का??; संघाचा बोचरा सवाल


विशेष प्रतिनिधी

पुणे : सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांना सनातन या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का??, असा बोचरा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्म म्हणजे डेंगू, मलेरिया, कोरोना आहे त्यामुळे त्याच्या निर्मूलनाची गरज आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला “इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांनी पाठिंबा दिला. परंतु त्यामुळे देशभर संताप उसळला. उदारमतवादी सनातन धर्मीयांनी या टीकेचा तीव्र निषेध केला. या पार्श्वभूमीवर संघाचे प्रवक्ते डॉ. मनमोहन वैद्य यांनी पुण्यातल्या समन्वय बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांचे वाभाडे काढले.Sanatan Dharma even understand the meaning of the word Sanatan??; The question of the team

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांना सनातन या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का??, 20000 वर्षांपासून या देशाची संस्कृती अध्यात्माशी संबंधित आहे आणि त्यात काळानुरूप बदल झाले आहेत. सुधारणा झाल्या आहेत. त्या संस्कृतीला सनातन धर्म असे म्हणतात. सनातन धर्माचा रिलीजन या शब्दाशी काहीही संबंध नाही, याची आठवण मनमोहन वैद्य यांनी करून दिली.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील सर्व संघटनांची समन्वय बैठक पुण्यातल्या एस पी कॉलेजमध्ये झाली. त्या बैठकीनंतर मनमोहन वैद्य यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना सनातन धर्मावरील टीकेसंदर्भात प्रश्न विचारला, त्यावेळी वैद्य यांनी संघ परिवाराची भूमिका स्पष्ट केली.

सनातन धर्म भारताच्या आध्यात्मिक रचनेचा आत्मा आहे. भारताचे व्यक्तिमत्वच या शब्दाने वर्णन करता येते. पाश्चिमात्यांनी ज्या पद्धतीने रिलिजन आणि या शब्दाचा अर्थ लावला, त्या पद्धतीने भारतात धर्म या शब्दाचा अर्थ लावता येत नाही. भारताची आध्यात्मिक चेतना सांगणारा सनातन धर्म आहे. धर्माला ग्लानी आली, त्यात काही कुरीती शिरल्या, तर त्यात सुधारणा करण्याची पद्धत देखील सनातन धर्मात उपलब्ध आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत शेकडो संत महात्म्यांनी त्यामध्ये सुधारणा केल्या आहेत. परंतु मूळ अध्यात्मिक चेतना त्यातून लोप पावली नाही, तर ती अधिक उजळून निघाली, असे मनमोहन वैद्य यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी सनातन धर्म नष्ट करायला निघालेल्या लोकांना सनातन या शब्दाचा अर्थ माहिती तरी आहे का??, असा सवाल केला.

ज्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या नेत्यांनी सनातन धर्म संपविण्याची भाषा केली, त्याच पक्षाचे एक नेते तामिळनाडूतील अर्काट जिल्ह्यातील संघाच्या एका शाखेत आले होते. त्यांनी तिथली समता आणि समरसता पाहून मिठाई वाटली. सर्व समाज एक व्हावा हे पेरियर यांचे स्वप्न मला संघात बघायला मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली होती, असे मनमोहन वैद्य म्हणाले.

Sanatan Dharma even understand the meaning of the word Sanatan??; The question of the team

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात