अभिनेत्री विजयालक्ष्मीने नाम तमिलार काच्ची नेता सीमन विरुद्धची बलात्कार आणि खंडणीची तक्रार घेतली मागे


विजयालक्ष्मीने सांगितले आहे की ती बंगळुरूमध्ये जाऊन काही काळ राहणार आहे.

विशेष प्रतिनिधी

वलासारवक्कम  :अभिनेत्री विजयालक्ष्मीने शनिवारी चेन्नईतील वलासारवक्कम पोलिसांकडे चित्रपट दिग्दर्शक आणि नाम तमिलार काच्ची नेता सीमन यांच्याविरुद्धची तिने केलेली बलात्कार आणि खंडणीची तक्रार मागे घेण्यासाठी पत्र सादर केले. पोलिसांना पत्र सादर केल्यानंतर विजायलक्ष्मीने म्हटले की,  ”सीमन महान आहे आणि तामिळनाडूत त्याची खूप ताकद आहे. सीमनने वाईटरित्या शिवीगाळ केली पण जाऊ द्या, मी यामध्ये  माझा पराभव मान्य करते. यानंतर विजयालक्ष्मीने सांगितले की ती बंगळुरूमध्ये जाऊन काही काळ राहणार आहे. Actress Vijayalakshmi withdraws rape and extortion complaint against Naam Tamilar kacchi leader Seeman

तपास अधिकाऱ्यांने सांगितले की, ज्याप्रकारे विजयालक्ष्मी यांनी त्रिवुल्लुरू महिला  आयोगाच्या न्यायमूर्तीसमोर अगोदर तक्रार दाखल केली होती, त्यांनतर त्यांना कदाचित मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असू शकतो.

पोलिसांनी सांगितले की,त्यांनी विजयालक्ष्मी यांचे तक्रार मागे घेण्यासंदर्भातचे पत्र स्वीकरले आहे. आम्ही ते न्यायालयासमोर सादर करू, त्यानंतर ही केस बंद होण्यास काही आठवडे लागू शकतात, न्यायालयच निर्णय घेईल.

खरंतर विजायलक्ष्मी यांनी बलात्कार आणि खंडणी वसुलीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना गुरुवारीच सीमन यांना चौकशीसाठी १८ सप्टेंबर  रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आता विजयालक्ष्मी यांनी तक्रार मागे घेतली आहे.

Actress Vijayalakshmi withdraws rape and extortion complaint against Naam Tamilar kacchi leader Seeman

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात