विशेष प्रतिनिधी
वाराणसी : सनातन धर्माबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केली जात असलेल्या वादग्रस्त विधानांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सनातनला नावं ठेवणाऱ्या सर्वांचा २०२४ मध्ये मोक्ष होणार आहे. सनातन धर्माचे सार काशीत आहे. रामचरित मानसची पोटॅशियम सायनाइडशी तुलना झाल्यानंतर त्यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना हे विधान केले. In Varanasi Ramdev Baba criticized those who criticized Sanatan Dharma
योगगुरू म्हणाले, काशी ही शाश्वत नगरी आहे. अनादी आणि अनंताची पूजा करण्यासाठी हे एक उत्तम तीर्थक्षेत्र आहे. हे ज्ञान आणि मोक्षाचे शहर आहे. त्यात युगानुयुगे देवत्व होते, पण पंतप्रधान मोदींनी त्यात भव्यता वाढवली. आता ते संपूर्ण जगाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
भारतीय सांस्कृतिक वारसा असलेले हे महातीर्थ काशी हेल्थ टुरिझम, धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटनासाठी जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्ञान पर्यटन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक पर्यटन हे सनातन धर्माचे सार आहे. असे रामदेव बाबांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more