विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सॅम पित्रोदा; राजीव गांधींचे जिवलग आणि राहुल गांधींचे सल्लागार वर्णद्वेषी वक्तव्यामुळे व्हावे लागले पायउतार!! केवळ अस्थानी बडबडीमुळे सॅम पित्रोदा नावाच्या एका टेक्नोक्रॅटचा आज राजकीय शेवट झाला. त्याला कारणीभूत ना भाजप ठरला, ना काँग्रेस ठरली, त्याला कारणीभूत सॅम पित्रोदा यांची स्वतःचीच आत्मघाती वर्णद्वेषी कमेंट ठरली!!Sam Pitroda : Rajiv Gandhi’s best friend; Adviser to Rahul Gandhi; Had to step down due to racist remarks!!
सॅम पित्रोदा राजीव गांधींचे तंत्रज्ञान विषयक सल्लागार होते. त्यांच्यामुळे देशात संगणक क्रांती झाली, असे काँग्रेसमध्ये बोलले गेले. राजीव गांधींच्या काळात सॅम पित्रोदा यांचा रुतबा काँग्रेसमधल्या कुठल्याही बड्या नेत्यापेक्षा जास्त होता. ते गांधी परिवाराचे निकटवर्ती सल्लागार होते. सोनिया गांधी यांनीच त्यांना ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष नेमले होते, पण आता त्यांना पायउतार व्हावे लागले.
याची कहाणी अशी :
भारताच्या विविधतेचे वर्णन करताना सॅम पित्रोदा यांची जीभ अचानक घसरली. भारताच्या पूर्वेकडचे लोक चिन्यांसारखे दिसतात. पश्चिमेकडचे लोक अरबांसारखे सारखे दिसतात. दक्षिणेकडचे लोक आफ्रिकन दिसतात आणि उत्तरेकडचे लोक गोरे दिसतात. पण हे सगळे भारतीय आहेत. राम मंदिर, पंतप्रधान मोदींनी सातत्याने फक्त मंदिरात जाणे यामुळे मोदी द्वेष पसरवत आहेत असे सॅम पित्रोदा म्हणाले.
त्यांचे हे वक्तव्य त्यांना आणि काँग्रेसला राजकीय दृष्ट्या फार महागात पडले. काँग्रेसने अधिकृतपणे त्या वक्तव्यापासून आपले हात झटकले. सगळे भारतीय वेगवेगळ्या देशांमधले दिसतात हे सॅम पित्रोदांचे वक्तव्य काँग्रेसला मंजूर नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे त्याचा काँग्रेसशी संबंध नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी हात झटकून टाकले.
In the dock over controversial remarks, Sam Pitroda resigns as Chairman of Indian Overseas Congress Read @ANI Story | https://t.co/AmFsUeYZY7#SamPitroda #IndianOverseasCongress pic.twitter.com/IDO0nVNFJa — ANI Digital (@ani_digital) May 8, 2024
In the dock over controversial remarks, Sam Pitroda resigns as Chairman of Indian Overseas Congress
Read @ANI Story | https://t.co/AmFsUeYZY7#SamPitroda #IndianOverseasCongress pic.twitter.com/IDO0nVNFJa
— ANI Digital (@ani_digital) May 8, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगण मधल्या आपल्या भाषणांमधून सॅम पित्रोदा आणि राहुल गांधींचा जबरदस्त समाचार घेतला. त्यामुळे पित्रोदांचे वक्तव्य अचानक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यांचा वर्ण काळा आहे म्हणूनच त्यांना काँग्रेसने पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले होते, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
लोकसभा निवडणुकीतल्या भर प्रचार सभेत हा आरोप झाल्याने काँग्रेस पूर्णपणे अडचणीत आली. काँग्रेसमध्ये सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर अंतर्गत मोठा खल झाला. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर ठीक, अन्यथा काहीतरी कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागेल, असा इशारा परस्पर त्यांना दिला गेला. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी स्वतःहून ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ताबडतोब मंजूर केला. सॅम पित्रोदा यांनी केवळ बडबोलेपणातून आपले महत्त्वाचे पद गमावले.
2019 च्या निवडणुकीत शीख विरोधी दंगली संदर्भात त्यांनी असेच बेजबाबदार वक्तव्य केले होते. “हुआ तो हुआ” असे ते म्हणाले होते. त्यावेळी मोठा राजकीय गदारोळ झाला होता. पण त्यांना ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष पद गमवावे लागले नव्हते. मात्र, आता भारतीय लोकांबद्दल वर्णद्वेषी कमेंट केल्यानंतर त्यांचे राहुल गांधींच्या काँग्रेसला सॅम पित्रोदांचे पद वाचविणे कठीण केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App