विशेष प्रतिनिधी
पाटणा : एका बाजुला सख्खा भाऊ विरोधात असताना मामा साधू यादव यांनीही तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यांची बेरोजगारी हटाओ यात्रा म्हणजे नाटक असल्याचे सांगत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या समाजसुधार अभियानाची स्तुती केली आहे. तर, तेजस्वी हे कधीच राज्याचे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत, अशी टीकाही केली आहे.Sadhu Yadav says Tejaswi Yadav will never be able to become CM
साधू यादव म्हणाले की, तेजस्वी यादव हे जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र, जनतेने त्यांना ओळखले आहे. बेरोजगार यात्रेबाबत बोलणाऱ्यांनी हे सांगावे की, ते रोजगार देणार आहेत का? लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर आरोप करताना ते म्हणाले की, बिहारच्या जनतेला अंधकारात ढकलण्याचे काम हे लोक करत आहेत.
तेजस्वी यांनी मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यायला हवे. त्यांनी इतिहासाचे दाखले देत सांगितले की, ज्या घरात कोणी मुख्यमंत्री झालेले आहे तेथील कोणताही वारसदार मुख्यमंत्री झालेला नाही.तेजस्वी यादव यांच्या आई राबडीदेवी मुख्यमंत्री असताना बिहारच्या राजकारणात साधू यादव यांचा दबदबा होता. मात्र, राष्ट्रीय जनता दलाचा पराभव झाल्यावर त्यांचे महत्व कमी करण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App