बबूआ रंग बदलू लागला, दंगली घडविणाऱ्यांच्या स्वप्नात आता देव येऊ लागले, योगी आदित्यनाथ यांची अखिलेश यादवांवर टीका


विशेष प्रतिनिधी

सहारनपूर : समाजवादी पक्षाचे बबुआदेखील आता रंग बदलू लागले आहेत. ते म्हणत आहेत, की त्यांचे सरकार असते, तर राम मंदिर बांधले असते. आजकाल त्यांना स्वप्नंही खूप पडत आहेत. स्वप्नात येऊन देवही त्यांना म्हणत आहेत, की जेव्हा सरकारमध्ये होते, तेव्हा कोसी कलाची दंगल करवत होते,Babua began to change color, God began to appear in the dreams of the rioters, Yogi Adityanath criticizes Akhilesh Yadav

जवाहर बाग हत्याकांड घडवला, मुझफ्फरनगर दंगली घडवल्या. यांच्याकडे बघून सरड्यालाही लाज वाटत असेल, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यावर केली आहे.देवबंद येथे जाहीर सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, गेल्या सरकारमध्ये आग लावली जात होती, आम्ही ती विझवण्याचे काम करत आहोत. यापूर्वी यूपीमध्ये अनेक दहशतवादी हल्ले व्हायचे.मुलींच्या सुरक्षिततेसाठी जे लोक धोकादायक होते, त्यांनाही माहीत आहे, की त्यांचे काय हाल होणार आहेत. कोरोनामध्ये जे लोक स्थलांतरित होत होते. तेही आता भाजीपाला विकण्यासाठी हातगाडी लावत आहेत. यापूर्वी कधी गुन्हेगारी नियंत्रणावर चर्चा होत नव्हती.

सहारनपूरमध्ये विद्यापीठ देण्याचे कामही आम्ही केले आहे. या विद्यापीठाला माँ शाकुंबरी देवी नाव देण्यात आले आहे.मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी अखिलेश यादव पाच वर्षांतून एकदाही आले नव्हते, मी डझनभरवेळा आलो आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम केले जात होते. आता आम्ही दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी एटीएस कमांडो तैनात करत आहोत, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांनी देवबंद येथे एटीएस कमांडो ट्रेनिंग सेंटरचे भूमिपूजन केले आणि विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि मोबाईलचे वाटप केले. तसेच फायर स्टेशनचे लोकार्पणही केले.सहारनपूरमध्ये लोकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. तुमच्या सुरक्षिततेसाठी एटीएस प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे.

Babua began to change color, God began to appear in the dreams of the rioters, Yogi Adityanath criticizes Akhilesh Yadav

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती