विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन समीट साठी पाकिस्तान मध्ये जाणाऱ्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इस्लामाबाद मध्ये जाऊन देखील भारत आणि पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला ठणकावले. जोपर्यंत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तानशी द्विपक्षीय वाटाघाटी करणार नाही, या भूमिकेचा त्यांनी पुनरुचार केला. S Jaishankar target to pakistan
शांघाय ऑपरेशन समिट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मध्ये होत आहे. कारण यंदा यजमान देश म्हणून पाकिस्तानची जबाबदारी आहे. पाकिस्तानी या समीट साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले होते, पण विशिष्ट व्यस्त कार्यक्रमांमुळे मोदी पाकिस्तानला जाणार नाही. त्यांच्या ऐवजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतील. इस्लामाबाद दौऱ्यात जयशंकर चीन, रशिया, कझाकिस्तान, किरगिस्तान, तुर्कमेनिस्तान आदी देशांच्या शिष्टमंडळाची द्विपक्षीय वाटाघाटी करतील.
Haryana Exit Poll : हरियाणात एक्झिट पोलच्या बळावर काँग्रेसचे 3 – 4 मुख्यमंत्री एकदम चढले गादीवर!!
परंतु पाकिस्तानी शिष्टमंडळाशी कोणत्याही द्विपक्षीय वाटाघाटी करायचे जयशंकर यांनी नियोजनच केलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानी शिष्टमंडळाशी भारतीय शिष्टमंडळाच्या द्विपक्षीय वाटाघाटी होणार नाहीत. जयशंकर पाकिस्तानात इस्लामाबादला आले पण त्यांनी पाकिस्तानशी कोणत्याही द्विपक्षीय वाटाघाटी केल्या नाहीत, यातून भारताची दहशतवादाविरोधात कठोर भूमिकाच अधोरेखित होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App