विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेल्या 1500 रुपयांच्या रकमेवरून महाविकास आघाडीतल्या विरोधकांनी सरकारला हिणवले, पण प्रख्यात गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांनी अत्यंत सोप्या शब्दांमध्ये त्या 1500 रुपयांचे महत्त्व सांगितले. Asha Bhosle said about Ladki Bahin Yojna
लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जे 1500 रुपये दिले आहेत, त्यामागचा आनंद माझ्यापेक्षा इतर कुणाला कळणार नाही. हेच काम जर १९४७ साली कुणी केलं असतं. तर मी दोन वेळचं जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. कारण दुपारी मी जेवत नव्हते. माझे पती सायंकाळी आल्यानंतर आम्ही दोघं मिळून जेवत होतो, अशी भावनिक आठवण आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारमधील मंत्र्यांसमोर सांगितली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभिजात मराठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशा भोसले यांनी लाडकी बहीण योजनेचे कौतुक करताना त्यांच्या आयुष्यातील खडतर दिवसांची माहिती दिली.
Haryana Exit Poll : हरियाणात एक्झिट पोलच्या बळावर काँग्रेसचे 3 – 4 मुख्यमंत्री एकदम चढले गादीवर!!
आशा भोसले म्हणाल्या :
आजच्या काळात कोटी, लाख यांची चर्चा होते. पण ज्या महिलांकडे जेवणासाठी थोडे पैसे नसतात त्यांच्यासाठी 1500 रुपये ही मोठी रक्कम असून महायुती सरकारने त्यांच्यासाठी मोठं काम केलं आहे. मी संगीत क्षेत्रात असले तरी मी एक गृहिणी आहे. एका महिलेला घरात जे काम करावं लागतं, ती सर्व कामं मी करते. घरातलं काम करता करता, मुलांना मोठं केलं. भोसले कुटुंब सांभाळलं. हे करता करता कधी ९२ वर्षांची झाले, हे ही कळलं नाही. कधी उपाशी राहून तर कधी जे आहे ते खाऊन दिवस काढले. पण कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत. हाच माझा गुरुमंत्र होता.
माझं घर सांभाळता सांभाळता मला इतर काहीच सांभाळता आलं नाही. मला राजकारणही समजलं नाही. म्हणून मला पंतप्रधान मोदींना एक प्रश्न विचारायचा आहे. ‘एवढा मोठा भारत तुम्ही कसा काय सांभाळता?’ आम्ही तर आमचं घरही सांभाळताना थकून जातो. प्रत्येकाच्या घरात आज जेवण शिजतंय, प्रत्येकाच्या घरात वीज आहे. हे सर्व तुम्ही केलं. मी तुमच्यापेक्षा वयानं मोठी आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देते. तुम्ही याच पद्धतीने काम करत रहा. आपला देश तुमच्या हातात राहो. तुमचे सहकारीही चागंले काम करत राहो!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App