वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देण्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी केली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष आणखी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Russian President Vladimir Putin announces the recognition of two separatist republics in eastern Ukraine – Donetsk and Lugansk – as independent
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.या घोषणेमुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुगंस्क यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांनी घोषित केले आहे.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनेत्सक पीपल्स रिपब्लिक (डीपीआर) आणि लुगांस्क पीपल्स रिपब्लिक (एलपीआर)च्या मान्यतेशी संबंधित कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. रशिया आणि डीपीआर, एलपीआर यांच्यातील हा करार मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहाय्य याबद्दल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App