धुळ्यामध्ये कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करीत जीवन संपविण्याची घटना उघड

वृत्तसंस्था

धुळे: धुळ्यामध्ये पाच जणांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी विष प्राशन करीत जीवन संपविण्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.Attempted mass suicide of family in Dhule; Revealed the incident of ending life by consuming poison

धुळे जिल्ह्यातील मोहाडी परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे.१२ वर्षांच्या मुलांसह आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेतून सर्व जण अगदी थोडक्यात बचावले आहेत.
कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला आहे. धुळे शहरातील अवधान परिसरात ही घटना घडली.भरत पारधी असं आत्महत्या करणाऱ्या कुटुंबीयाचे नाव आहे. भरत पारधी पत्नी आणि मुलांसह या परिसरात राहत होते. आज संध्याकाळी अचानक भरत पारधी यांच्यास कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मुलगी जयश्री, पत्नी सविता, मुलं गणेश, गोपाळ अशी अन्य सदस्यांची नावे आहे. जयश्री (१४) आणि गोविंदा (१२) हे दोन लहान मुलं आहेत. शेजाऱ्यांनी सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पाचही जणांचे प्राण वाचले आहेत

Attempted mass suicide of family in Dhule; Revealed the incident of ending life by consuming poison

महत्त्वाच्या बातम्या