वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भडका जगाला परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष टाळून जगाला युद्धाच्या खाईत लोटु नये, अशी विश्वामित्र भूमिका भारताने घेतली आहे. India’s Vishwamitra role in the Russia-Ukraine dispute; Appeal to both countries to avoid war
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी केव्हा पडेल याचा नेम नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनच्या दोन प्रांताना स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे संघर्ष आणखी चिघळण्याचा धोका आहे.
या घडामोडीच्या पार्श्वभूमिवर भारताने तटस्थ भूमिका घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडताना टीएस त्रिमूर्ती म्हणाले, हा प्रश्न चर्चेने सोडविला पाहिजे. युद्ध जगाला परवडणारे नाही. दोन्ही देशांतील संघर्ष वाढणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. लष्करी कारवाईने परिसरातील तणाव आणि शांतता नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App