विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या; राहुल गांधींच्या भारत जोडू यात्रेचा उत्पन्नापेक्षा खर्चच मोठा!!, असे चित्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या हिशेबातून समोर आले आहे Rs 50 Lakh Per Day, Rs 1.59 Lakh Per Kilometre: What Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra Cost Congress | Exclusive
यात दररोज 50 लाख रुपये, प्रति किलोमीटर 1.59 लाख रुपये हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा खर्च निघाला. हा आकडा काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखापरीक्षणातून समोर आला आहे. काँग्रेसने चालू आठवड्यातच निवडणूक आयोगाकडे पक्षाचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला. त्यामध्ये पक्षाचे उत्पन्न 452 कोटी रुपये दाखवले पण पक्षाने 2022 – 23 मध्ये 467 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये पक्षाच्या 192 कोटी रुपयांच्या निवडणूक खर्चाचाही समावेश आहे.
7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूतून सुरू झालेल्या आणि 30 जानेवारी 2023 रोजी जम्मू – काश्मीरमध्ये संपलेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला दररोज सुमारे 50 लाख रुपये खर्च आला. यामध्ये प्रवासाच्या अंतराच्या बाबतीत सरासरी 1.59 लाख रुपये प्रति किलोमीटर खर्च आला.
काँग्रेसचे उत्पन्न 452 कोटी रुपये दाखविले तर पक्षाने 2022 – 23 या आर्थिक वर्षात 467 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये 192 कोटी रुपयांच्या निवडणूक खर्चाचाही समावेश आहे. काँग्रेसने भारत जोडो यात्रेवरचा खर्च ‘प्रशासकीय आणि सामान्य खर्च’ या खात्यात टाकला. तो 71.83 कोटी रुपये निघाला. ही यात्रा कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि श्रीनगरमध्ये संपली. ती 145 दिवस चालली, त्यात मधल्या ब्रेकसह. यात्रेत सुमारे 4500 किलोमीटरचे अंतर पार केले.
मागील वर्षाच्या तुलनेत 2022 – 23 मध्ये “प्रशासकीय आणि सामान्य खर्च” अंतर्गत काँग्रेस पक्षाच्या खर्चात 2.6 पट वाढ झाली. आहे. तसेच, पक्षाचा एकूण खर्च 2021-22 आणि 2022-23 दरम्यान 400 कोटी रुपयांवरून 467 कोटी रुपयांवर पोहोचला.
दुसरीकडे, काँग्रेसचे उत्पन्न 2021-22 मधील 541 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 452 कोटी रुपयांवर घसरले आहे, असे अहवालात दिसून आले आहे. पक्षाला देणग्या, अनुदान आणि योगदान सुमारे 80 कोटी रुपयांनी लक्षणीयरीत्या घसरले आहे.
तर 2021-22 मधील 347 कोटी रुपयांवरून काँग्रेसचे उत्पन्न 2022-23 मध्ये 268 कोटी रुपयापर्यंत घसरले.
काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रेचा एक भाग म्हणून 27 जानेवारी 2024 पासून महिनाभरासाठी “न्यायसाठी दान” क्राउड-फंडिंग मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत यात्रेच्या प्रत्येक किलोमीटरसाठी लोकांनी पक्षाला देणग्या दिल्या. या यात्रेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, अनेक व्यक्तींनी प्रति किलोमीटर 20 रुपये ते 100 रुपये प्रति किलोमीटरपर्यंतची रक्कम दान केली. हे 1.34 लाख ते 6.70 लाख रुपये होते. “न्यायसाठी देणगी” मोहिमेत काँग्रेसला फक्त 4 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App