भारतीय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात फायदा, त्याची राहुल गांधींना पोटदुखी; भाजपचे सडेतोड प्रत्युत्तर!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : खोटा एक्झिट पोल चालवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 30 लाख कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केला, असा आरोप करून त्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केली. त्यांनी या संदर्भात एक मोठे प्रेसेंटेशन पत्रकारांसमोर केले त्यामुळे देशावर 30 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चर्चा सुरू झाली. retail investors of India also benefited during this period.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींचे सगळे आरोप खोडून काढले. भारतीय गुंतवणूकदारांना शेअर बाजारात लाभ झाला, त्याची राहुल गांधींना पोटदुखी झाली, असा टोला त्यांनी हाणला.

पियुष गोयल म्हणाले :

2024 च्या एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा बाजार वाढत होता, तेव्हा बाजारात परकीय गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी त्याचा फायदा घेऊन शेअर्सची खरेदी केली. गेल्या 2 महिन्यांतील या वाढीचा मोठा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

पण ज्या दिवशी एक्झिट पोल आला, त्या दिवशी परकीय गुंतवणूकदारांनी अनेक शेअर्सची चढ्या भावाने खरेदी केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी चढ्या भावाने 6,850 कोटी रुपयांची किरकोळ खरेदी केली आणि दुसऱ्या दिवशी निकाल लागला, तेव्हा भारतीय गुंतवणूकदारांनी त्याचा फायदा घेतला जेव्हा बाजार घसरला तेव्हा विदेशी गुंतवणूकदारांनी कमी किमतीत विक्री केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी मोदी सरकार येणार आहे आणि त्याचा फायदा आम्ही घेऊ, या विश्वासाने विदेशी गुंतवणूकदारांनी चढ्या भावाने खरेदी केली आणि कमी किमतीत विकली. भारतीय गुंतवणुकदारांनी कमी किमतीत विकले, त्यामुळे या काळात कोणाचेही नुकसान झाले नाही.

भारतीय गुंतवणूकदारांचा फायदा झाला. त्याची राहुल गांधींना पोटदुखी झाली. त्यांना शेअर बाजारातील मूल्य आणि मूल्यमापन समजत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या 30 लाख कोटींच्या शेअर घोटाळ्याच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांकडून खरेदी आणि विक्री हे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरचा परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले. याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना झाला आहे. त्यामुळे भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांनाही या काळात फायदा झाला, हे जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकाच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे, याकडे पियुष गोयल यांनी लक्ष वेधले.

retail investors of India also benefited during this period.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात