छत्तीसगडमधील दणदणीत पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू

काँग्रेस उपाध्यक्ष चुन्नीलाल साहू यांनी दिला राजीनामा


विशेष प्रतिनिधी

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि हकालपट्टीच्या कारवाईबरोबरच राजीनाम्यांची प्रक्रियाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार चुन्नीलाल साहू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.Resignation session begins in Congress after resounding defeat in Chhattisgarh



PCC अध्यक्ष दीपक बैज यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडल्याचे लिहिले आहे. विधानसभेच्या चारही जागा काँग्रेसने जिंकल्या, पण पक्षाच्या दारुण पराभवामुळे मी राजीनामा देत आहे. असे त्यांनी म्हटले आहे. चुन्नीलाल साहू यांच्या आधी रायपूर दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार महंत राम सुंदर दास यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पाली तनाखारचे माजी आमदार मोहित राम केरकेट्टा यांनीही राजीनामा दिला आहे.

दोन माजी आमदारांची हकालपट्टी

काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी टीएस सिंगदेव आणि राज्य प्रभारी कुमारी सेलजा, प्रभारी सचिव चंदन यादव यांना जबाबदार धरणाऱ्या बृहस्पती सिंह आणि विनय जयस्वाल यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर माजी मंत्री जयसिंग अग्रवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Resignation session begins in Congress after resounding defeat in Chhattisgarh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub