Yasin Malik फुटीरतावादी नेता यासीन मलिकची सुटका करा; मलिकच्या पत्नीचे राहुल गांधींना पत्र लिहून साकडे!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरल्याचा आरोप होत असतानाच त्यांच्या फुटीरतावादी नेत्यांविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर वेगळ्या पद्धतीने समोर आला. काश्मीर मधला फुटीरतावादी नेता यासीन मलिक याची तुरुंगातून सुटका करा, अशी मागणी करणारे पत्र मलिकची पत्नी मुशाल हुसेन मलिक हिने राहुल गांधींना पाठवले आहेत. या पत्रामुळे काँग्रेसची गोची झाली आहे.

यासीन मलिक हा टेरर फंडिंग आणि दहशतवादी कृत्यांना चिथावणी या आरोपांखाली तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. परंतु, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबर फुटीरतावादी नेत्यांना हुरूप वाढला आहे. या हुरूपामधूनच यासीन मलिकच्या पत्नीची थेट राहुल गांधींना पत्र लिहायची हिंमत झाली आहे.


Amit Shah : दहशतवादाविरोधातील उपाययोजनांवर दोन दिवस विचारमंथन सुरू राहणार


यासीन मलिक 35 वर्षांपूर्वीच्या टेरर फंडिंगच्या केस मध्ये आणि दहशतवादी कृत्यांना चिथावणी दिल्याच्या केस मध्ये तुरुंगात शिक्षा भोगत आहे. परंतु जम्मू – काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी यासीन मलिकची नक्की मदत होऊ शकते. सबब तुम्ही संसदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने यासीन मलिकच्या सुटकेचा मुद्दा लावून धरा, अशी मागणी मलिकची पत्नी मुशाल हुसेन मलिक हिने राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

या पत्रामुळे काँग्रेसची गोची झाली आहे. कारण यासीन मलिक आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीचे फोटो काँग्रेससाठी अडचणीचे ठरले होते. आता त्या पुढे जाऊन थेट फुटीरतावादी नेत्याच्या पत्नीने राहुल गांधींना पत्र लिहून त्याची सुटका करायची मागणी केल्याने काँग्रेस + राहुल गांधी आणि फुटीरतावादी नेते यांचे कनेक्शन उघड झाले आहे.

Release Yasin Malik his wife to letter rahul gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात