‘पतंजलीची माफीनाम्याची जाहिरात मोठ्या आकारात प्रसिद्ध करा’

रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश! Release Patanjalis apology ad in large format Supreme Court order to Ramdev Baba and Acharya Balkrishna

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेदाने औषधांबाबत केलेल्या ‘भ्रामक दाव्यां’बद्दल न्यायालयाच्या अवमानाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना खडसावले. यासोबतच न्यायालयाने रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांना 30 एप्रिल रोजी पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने रामदेवबाबा यांना पतंजलीची माफीनाम्याची जाहिरात पुन्हा मोठ्या आकारात प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. कोर्टाने फटकारले असताना रामदेव यांनी नवी जाहिरात छापण्यास सांगितले होते, ज्याला न्यायालयाने मान्यता दिली.

रामदेव यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही माफीनामा दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी काल का दाखल केला असा सवाल केला. आम्ही आता गठ्ठे पाहू शकत नाही, ते आम्हाला आधी दिले पाहिजे होते. ते कुठे प्रकाशित झाले असा सवाल न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी केला. त्यावर उत्तर देताना मुकुल रोहतगी म्हणाले की, 67 वृत्तपत्रांमध्ये दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती कोहलीने विचारले की, तुमच्या आधीच्या जाहिराती सारख्याच आकाराच्या आहेत का? यावर रामदेव यांच्या वकिलाने सांगितले की नाही, यावर १० लाख रुपये खर्च झाले आहेत.

Release Patanjalis apology ad in large format Supreme Court order to Ramdev Baba and Acharya Balkrishna

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात