दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी स्वीकारला माफीनामा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: योगगुरू स्वामी रामदेव ( Ramdev Baba) आणि पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी रामदेव, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांनी मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मान्य केली.
याशिवाय अवमान प्रकरणही बंद करण्यात आले आहे. योगगुरू, बालकृष्ण आणि फर्मचे प्रतिनिधित्व करणारे वकील गौतम तालुकदार म्हणाले, “रामदेव, बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांनी दिलेल्या हमींच्या आधारे न्यायालयाने अवमानाची कारवाई बंद केली आहे.”
न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने या प्रकरणात रामदेव, बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना बजावलेल्या अवमान नोटीसवर 14 मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये रामदेव आणि इतरांवर कोविड लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांची बदनामी करण्यासाठी मोहीम चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने 27 फेब्रुवारी रोजी पतंजली आयुर्वेद आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांना नोटीस बजावली होती.
सर्वोच्च न्यायालयाने 19 मार्च रोजी सांगितले होते की रामदेव यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे योग्य आहे कारण पतंजलीने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती त्यांचे समर्थन दर्शवितात, जे 21 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायालयाला दिलेल्या वचननाम्याच्या विरुद्ध आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more