हरियाणातील निवडणुकीचा व्हिडीओ दाखवित अखिलेश यादव यांची कुंडातील निवडणूक रद्द करण्याची मागणी, राजा भय्या संतापले


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : हरियाणातील २०१९ च्या निवडणुकांतील व्हिडीओ शेअर करून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कुंडा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी केली. यामुळे जनसत्ता दलाचे अध्यक्ष रघुप्रताप सिंह उर्फ राजा भैय्या चांगलेच संतापले आहेत.Raja Bhaiya gets angry over Akhilesh Yadav’s demand for cancellation of polls in Kunda

राजा भय्या आणि सपा उमेदवार गुलशन यादव यांनी एकमेकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर अखिलेश यादव आणि राजा भय्या यांच्यात ट्विट युद्ध सुरू झाले. अखिलेश यादव यांच्या ट्विटला उत्तर देताना राजा भय्या म्हणाले, आदरणीय अखिलेशजी, तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणीही आहात.वरील व्हिडिओ २०१९ च्या निवडणुकीतील हरियाणाचा आहे. ज्याला तुम्ही कुंडकुळीत सांगून निवडणूक रद्द करण्याची मागणी करीत आहात. राजकारणात इतका द्वेष चांगला नाही.कुंडामध्ये महिलांची मते सार्वजनिकपणे दाबली जात आहे. व्हिडिओची दखल घेत निवडणूक निरीक्षकांनी कुंडाची निवडणूक रद्द करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली पाहिजे.

तसेच दोषी व्यक्तीची ओळख पटवून तात्काळ अटक करावी, असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले होते. प्रतापगड पोलिसांनी तपासणीनंतर व्हिडिओ हरियाणातील फरीदाबाद येथे झालेल्या मागच्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यानंतर अखिलेश यादव यांनी ट्विट डिलीट केले.

राजा भय्या हे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. समाजवादी पक्षाने कुंडामधून एकेकाळी त्यांच्या जवळचे असलेले गुलशन यादव यांना तिकीट दिले. तेव्हापासून कुंडाच्या निवडणुकीत चुरशीची स्पर्धा होणार असल्याची चर्चा होती.

Raja Bhaiya gets angry over Akhilesh Yadav’s demand for cancellation of polls in Kunda

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*