विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आयुर्मानात वाढ होत आहे. त्यामुळे वृध्द लोकही जास्त क्षमतेने काम करू शकतात. त्यामुळे निवृत्तीचे वय टप्प्या टप्याने वाढविण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने केली आहे.Raise retirement age due to increased health facilities, recommended by the Prime Minister’s Economic Advisory Council
समितीने जारी केलेल्या अहवालात कौन्सिलने म्हटले आहे की, निवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने वाढवण्याची गरज आहे. भारत हा तरुण देश आहे. काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढल्यानंतरही सध्याच्या तरुण कार्यशक्तीसाठी नोकऱ्या उपलब्ध होणारआहेत. त्यामुळे तरुणांच्या नोकऱ्यांबाबत तडजोड न करताही सेवानिवृत्तांना काम देणे शक्य होणार असल्याचे असे परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यामुळेच सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी होईल हे मान्य करणे चुकीचे आहे.कोणत्याही देशासाठी हे अवघडच आहे. पण त्यासाठी आणखीही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पेन्शनमधील भेद कमी करावा लागेल, असे अहवालात म्हटले आहे. पन्नास ते साठ वर्षाच्या कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यवृध्दीची शिफारसही करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी धोरणे आखली पाहिजेत.
यामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणारे, अल्पंसख्य आणि स्थलांतरीत यांचाही विचार करायला हवा. त्यांना प्रशिक्षणाच्या संधी कमी मिळतात. त्या वाढवायला हव्यात, असे अहवालात म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाºया हेल्प एज इंटरनॅशनल संस्थेच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्केपेक्षा जास्त म्हणजे सुमारे एक कोटी ३९ लाख लोक साठ वषर्शंचेआहे.
२०५० पर्यंत लोकसंख्येतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण दुप्पट म्हणजे १९.५ टक्के होईल. त्यावेळी प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल. त्यांच्या हाताला काम देणे आवश्यक ठरणार आहे. केरळमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक १२.५ टक्के आहे.
त्यापाठोपाठ गोव्यात ११.२० टक्के, तामीळनाडूत १०.४ टक्के आहे. दक्षिण भारतात कमी प्रजनन दर आणि नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लोकसंख्येतील ज्येष्ं नागरिकांचे प्रमाण वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App