वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्याचा आणि गर्दी टाळण्याचा एक उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने देशभरासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे परिसरात मास्क न लावता फिरणाऱ्यांवर जागीच प्रत्येकी ५०० रूपये दंड वसूलीची कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.railway administration announced 500 rs. fine for without mask public.
रेल्वेच्या परिसरात कोणीही व्यक्ती विनामास्क आढळल्यास त्या प्रत्येकाला जागीच ५०० रूपयांचा दंड ठोठवला जातो आहे आणि जाणार आहे, असे रेल्वेच्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर अकारण गर्दी करू नये, कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनीच गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोचावे.असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाने केले आहे.
स्टेशनवरची गर्दी रोखण्यासाठी ३० एप्रिल २०२१ पर्यंत प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नाहीत. फक्त ज्येष्ठ, दिव्यांग, रूग्ण इत्यादींना प्लॅटफॉर्मची तिकिटे ५० रूपये दराने दिली जात आहेत. कन्फर्म आणि आरएसी तिकिट असलेल्यानाच प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश आणि प्रवासाची परवानगी आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी स्टेशनवर गर्दी करू नये. विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असून त्यामध्ये सेकंड एसी, थ्री एसी, स्लीपर आणि द्वितीय आसन श्रेणीचे कोच आहेत. या विशेष गाड्यांत सामान्य, अनारक्षित कोच नाहीत.
कन्फर्म तिकीटाच्या प्रवाशांनीच पोचावे
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोचावे. रेल्वेचे पीआरएस काउंटर ,आयआरसीटीसी वेबसाईटवरून तिकीट बुक करण्याची व्यवस्था आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App