याआधी सरकारने राहुल नवीन यांना ईडीचे कार्यकारी संचालक बनवले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ED’ला स्थायी संचालक मिळाले आहेत. केंद्र सरकारने आयआरएस राहुल नवीन ( Rahul Navin )यांची ईडीचे नवे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.
याआधी सरकारने राहुल नवीन यांना ईडीचे कार्यकारी संचालक बनवले होते. ED चे नवीन संचालक राहुल नवीन यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ED चे विशेष संचालक असलेले IRS राहुल नवीन यांना ED चे संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी राहुल नवीन यांची ईडी संचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.
जेव्हा राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या विशेष संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली, त्याआधी ते प्रभारी संचालक पदावर कार्यरत होते. रिपोर्टनुसार, राहुल नवीन ईडीचे तत्कालीन संचालक संजय मिश्रा यांच्यासोबत ईडीचे काम पाहत होते. ते कमी बोलणारे पण पेन चालवण्यात माहीर मानले जातात. राहुल नवीन हे 1993 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असून ते मूळचे बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील आहे.
अंमलबजावणी संचालनालय हे वित्त मंत्रालयाचा भाग असलेल्या महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. ईडी आर्थिक गुन्हे, मनी लाँड्रिंग, परकीय चलन उल्लंघन आणि आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांचा तपास करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App