विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या अग्निवीर योजनेवर आधीच खार खाऊन असलेल्या राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते बनताच आपल्या पहिल्याच भाषणात लोकसभेत चालविला नॅरेटिव्ह खोटा, पण शहीद अग्निवीराच्या वडिलांनी सांगितला मदतीचा आकडा!!, असेच काल घडले. Rahul Gandhi’s narrative about Agniveer in the Lok Sabha is false
लोकसभेच्या पहिल्या सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी अग्निवीर योजनेवर तोंडसुख घेतले. केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत शहीद दर्जा दिला जात नाही, अशी खोटी माहिती राहुल गांधी यांनी सभागृहात दिली. याशिवाय शहीद झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांनाही मदत दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर मढला. त्या भाषणात राहुल गांधी यांनी बुलढाण्यातील शहीद अग्निवीर अक्षय गवते याचा उल्लेख केला होता. पण राहुल गांधी लोकसभेच्या पटलावर खोटं बोलले हे नंतर सिद्ध झाले.
राहुल गांधींच्या या दाव्यानंतर आता शहीद अग्निवीरचे वडील लक्ष्मण गवते यांनी मोठा खुलासा केला. लक्ष्मण गवते यांनी त्यांना आतापर्यंत एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांची मदत मिळाल्याची पुष्टी केली. अक्षय गवते हा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील अग्निवीर जवान होता. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असताना तो शहीद झाला. त्यानंतर सरकारने त्याच्या कुटुंबीयांना 1 कोटी 10 लाख रुपयांची मदत केली.
राहुल गांधींचा आरोप
सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्नीवर योजनेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शहीद अग्निवीर जवान अक्षय गवते यांचाही उल्लेख केला. अक्षय गवते हे सियाचीन येथे कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
याबाबत शहीद जवान अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता अक्षय गवते यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी सांगितलं की, आतापर्यंत अक्षयचा विमा आणि राज्य सरकारने दिलेले 10 लाख रुपये असे मिळून त्यांना आतापर्यंत 1 कोटी 10 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
सरकारकडून अजून काय अपेक्षा आहेत??, असं विचारल्यानंतर लक्ष्मण गवते म्हणाले की, सरकारने अक्षयची बहिण श्वेता गवते हिला शासकीय सेवेत सामावून घ्यावं आणि जाहीर केलेली सर्व मदत त्यांना मिळावी.
अग्निवीर कुटुंबाला किती मदत मिळते?
लष्कराच्या वेबसाइटनुसार, अग्निवीरचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्याला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण, 44 लाख रुपये एक्स-ग्रॅशिया रक्कम, 4 वर्षांच्या योगदानासाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी आणि सरकारमध्ये जमा केलेल्या रकमेसह सेवा निधी मिळेल.
ड्युटीवर असताना अग्निवीरचा मृत्यू झाला नाही, तर कुटुंबाला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान मिळते. त्याच वेळी अपंगत्वाच्या बाबतीत, अग्निवीरला अपंगत्वाच्या पातळीनुसार, 100 %, 75 % किंवा 50 % असेल तर पूर्ण पगार आणि सेवा यावर अवलंबून 44 लाख रुपये, रुपये 25 लाख किंवा रुपये 15 लाख रुपये मिळतात. 4 वर्षांपर्यंतचा निधी, आणि सेवा निधी निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान त्याला दिले जाते.
ही सगळी माहिती बघता आणि शहीद अग्निवीराच्या वडिलांनी दिलेली माहिती पाहता राहुल गांधी लोकसभेत खोटं बोलले हे सिद्ध झाले. सदनाच्या पटलावर खोटी माहिती देणे किंवा आक्षेपार्ह माहिती देणे हा नियमभंग आहे. यासंदर्भात संसदेचे नियम कठोर आहेत. आता त्या नियमाला अनुसरून संसद राहुल गांधींनी संदर्भात कोणता निर्णय घेणार हे पहा हे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App