तीन राज्यांमधील पराभवानंतर निवडणूक निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले…

RAHUL GANDHI
  • तेलंगणातील विजायवरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “विचारधारेची लढाई सुरूच राहणार…” मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यापैकी मध्य प्रदेशात भाजपने सत्ता कायम ठेवली असून राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहेत. तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.Rahul Gandhis reaction to election results after defeat in three states

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर – राहुल गांधींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले- “आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो, विचारधारेचा लढा सुरूच राहील. मी तेलंगणातील जनतेचा खूप आभारी आहे – प्रजालू तेलंगणा बनवण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या परिश्रम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.”



‘प्रजालू’ म्हणजे सर्वसामान्यांसाठी काम करणारे. याउलट ‘दोरालू’ म्हणजे जमीनदारांसाठी काम करणारे. तेलंगणातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा हा मुख्य मुद्दा राहिला आहे. राहुल गांधींनी तेलंगणातील मतदारांचेही आभार मानले.

राजस्थान, छत्तीसगडबाबत राहुल गांधींनी आधीच केली होती भविष्यवाणी, म्हणाले होते…

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर जंग जंग पछाडले. मोफत वस्तूंचा आणि काँग्रेसच्या गॅरंटीचा जनतेवर भडीमार केला, पण प्रत्यक्षात यापैकी कुठलीच जादू चारही राज्यांमधल्या मतदारांवर चालली नाही. जी थोडीफार जादू चालली, ती फक्त तेलंगणात चालली!! पण तेथे देखील भाजपचा पराभव करण्याचा आनंद काँग्रेसला मिळाला नाही, तर काँग्रेसने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव करून तेलंगणात सत्ता मिळवली.

Rahul Gandhis reaction to election results after defeat in three states

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात