1971 इंदिराजींनी दिला होता, गरीबी हटावचा नारा; मोदींनी 2024 मध्ये केला, मोदी की गारंटीचा वायदा!!

Similarity between 1971 and 2014 loksabha elections

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सकारात्मक राजकीय कार्यशैलीमध्ये विलक्षण साम्य आहे. त्यांच्या भोवतालच्या राजकीय परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला, तर त्यामध्येही अनेक साम्य स्थळे आढळतील. त्यामुळेच इंदिराजींची कार्यशैली आणि मोदींची कार्यशैली याच्यातही समानता आढळतील. Similarity between 1971 and 2014 loksabha elections, Indira Gandhi won despite United opposition, what will happen in 2024??

1975 ते 1977 हा आणीबाणीचा काळा कालखंड वगळला तर इंदिरा गांधींची देशातल्या सर्वसामान्य जनतेमधली प्रतिमा ही धडाडीच्या आक्रमक नेत्या अशीच राहिली होती. त्याला 1971 च्या युद्धाची पार्श्वभूमी होती. त्या युद्धात इंदिराजींनी पाकिस्तानला कायमचा तडाखा देत त्या देशाचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली होती. त्याचाच राजकीय फायदा उचलण्यासाठी इंदिरा गांधींनी लोकसभेची 1 वर्ष आधी मुदतपूर्व निवडणूक घेतली होती. ते वर्ष होते, 1971!!

नेमक्या त्याच वर्षी सर्व विरोधकांनी मिळून डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या तत्त्वानुसार विरोधकांची आघाडी बनवली होती आणि त्या आघाडीला “जनता महाआघाडी” असे नाव दिले होते. त्यामध्ये मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंह, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी असे दिग्गज नेते सामील होते, पण या दिग्गज नेत्यांच्या तुलनेत इंदिरा गांधी तरुण होत्या. त्या निवडणुकीत जनता महाआघाडीने “इंदिरा हटाव” ही घोषणा दिली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये बरेच मंथन झाले आणि त्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी इंदिरा गांधींनी विरोधक म्हणतात, “इंदिरा हटाव”, पण मी म्हणते “गरीबी हटाव” ही ऐतिहासिक घोषणा दिली आणि हीच घोषणा “गेम चेंजर” ठरली.

जनता महाआघाडीतले नेते कितीही दिग्गज असले, तरी त्या महाआघाडीचा “गरिबी हटाव” घोषणे पुढे धुव्वा उडाला. कारण जनता महाआघाडीतले नेते दिग्गज असले तरी अतितात्विक राजकारण आणि फाटाफुटीचे राजकारण करण्यात ते अव्वल होते. ते इंदिरा गांधीपेक्षा जनतेमध्ये जास्त विश्वास निर्माण करू शकले नाहीत.

RAHUL GANDHI

जनता महाआघाडीच्या नेत्यांच्या तुलनेत इंदिरा गांधी तरुण होत्या, पण उपक्रमशील होत्या. त्यांची राजकारण शैली आक्रमक होती. त्यांनी 1971 च्या निवडणुकीत 125 तरुण आणि नव्या नेत्यांना इंडिकेट काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी दिली होती. इंदिरा गांधींची “गरिबी हटाव” ही घोषणा आणि त्यांनी दिलेले तरुण उमेदवार हा फॉर्म्युला कमालीचा यशस्वी ठरला. मोरारजी, वाजपेयी यांच्यासारखे अनुभवी नेते इंदिरा गांधींच्या नेतृत्वापुढे फिके पडले आणि महाआघाडीचा सुपडा साफ झाला होता.

1971 च्या त्या लोकसभा निवडणुकीत आणि 2024 च्या या लोकसभा निवडणुकीत विलक्षण साम्य आहे.

त्या निवडणुकीत इंदिरा गांधी विरुद्ध बाकी सगळे अशी लढत होती. या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध बाकी सगळे अशी लढत होणार आहे.

त्यावेळी विरोधी आघाडीने “इंदिरा हटाव” ही घोषणा दिली होती. इंदिरा गांधींनी “इंदिरा हटाव” या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी “गरिबी हटाव” ही प्रतिघोषणा दिली.

2024 च्या निवडणुकीत विरोधकांची “मोदी हटाव” हीच अप्रत्यक्ष घोषणा आहे. या घोषणेच्या विरोधात मोदींनी “मोदी की गारंटी” ही प्रतिघोषणा दिली आहे.

1971 चा निकाल तर इंदिरा गांधींच्या बाजूने लागला. 2024 च्या निकालांची झलक कालच 2023 च्या चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांनी दाखवली आहे. 2024 पूर्वीच्या राजकीय सिनेमाचा तो ट्रेलर होता. त्यामुळे सिनेमा कसा असणार?? हे उघड आहे.

पण काही झाले, तरी इंदिरा गांधींच्या त्या वेळच्या विरोधी आघाडीतले नेते आजच्या INDI आघाडीतल्या विरोधी नेत्यांपेक्षा जास्त “पॉलिटिकली मॅच्युअर” होते. आजच्या मोदी विरोधी आघाडीतल्या नेत्यांसारखे ते खुळचट नव्हते!!… हा 1971 आणि 2024 च्या निवडणुकीतला फार मोठा “गेम चेंजर” फरक आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात त्यावेळी मोरारजी देसाई, चरणसिंह, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी होते, पण त्यापैकी कोणीही “राहुल गांधी” नव्हते. कारण इंदिरा गांधी तेवढ्या “भाग्यवान” नव्हत्या.

मोदींविरोधात आज मोरारजी देसाई, चरण सिंह, जॉर्ज फर्नांडिस किंवा अटल बिहारी वाजपेयी नाहीत, पण “राहुल गांधी” आहेत. मोदी इंदिरा गांधींपेक्षा “भाग्यवान” आहेत!!… मग 2024 च्या लोकसभा निवडणुकांचा निकाल काय लागेल…??, हे वेगळं सांगायची गरज आहे…??

Similarity between 1971 and 2014 loksabha elections, Indira Gandhi won despite United opposition, what will happen in 2024??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात