विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये चालली मोदींची गॅरंटी, राबले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते, विजय मिळवला भाजपने, पण त्या विजयाचे श्रेय लाटून घेतले भलत्यांनीच!! अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे “राजकीय कर्तृत्व” दाखविले. भाजपच्या विजयाचे “श्रेय” राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःच्या पायगुणांवर ओढून घेतले!! Modi’s guarantee in the semi finals
राष्ट्रवादीतील काका – पुतण्याचा आणि बहिण भावांचा संघर्ष टोकाला पोहोचल्यानंतर अजित पवारांनी भाजपच्या सत्तेची वळचण पकडली. त्याला 5 महिने पूर्ण झाले. सहावा महिना लागला. पण मूळ गुण नाही गेला, हेच म्हणावे लागेल!! कारण राजकारण कुठेही होवो, विजय कुणाचाही होवो, कुठूनतरी बादरायणी संबंध जोडून त्या विजयाचे “श्रेय” साहेबांनाच देण्याची राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांची जुनी खोड आहे.
या खोडीनुसारच राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रवक्ते आमदारामुळे मिटकरी यांनी तीन राज्यांमधल्या भाजपच्या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायगुणांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाली. अजित पवारांचा पायगुण भाजपसाठी यशस्वी ठरला, अशी वक्तव्ये हसन मुश्रीफ आणि अमोल मिटकरी यांनी केली. पवारनिष्ठ माध्यमांनी ती हायलाईट केली.
वास्तविक चारही राज्यांमधल्या भाजपच्या विजयी कामगिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि अजित पवारांचा दुरान्वयेही संबंध नाही. स्वतः अजित पवार किंवा त्यांच्या पक्षातले कोणीही भाजपच्या प्रचारासाठी कुठल्याही राज्यात फिरले नाहीत किंवा भाजपच्या नेत्यांनी देखील अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रचारासाठी बोलवून त्यांचे महत्त्व वाढविले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच नेते चारही राज्यांमध्ये प्रचारासाठी विशिष्ट ठिकाणी जाऊन आले. तो भाजपच्या निवडणूक नियोजनाचा भाग होता. भाजपने आपल्या या नियोजनात अजित पवार आणि राष्ट्रवादीला सहभागी देखील करून घेतले नव्हते, तरी देखील “खोबरं तिथं चांगभलं” या म्हणीप्रमाणे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या विजयाचे “श्रेय” स्वतःच्या पक्षाच्या पायगुणांना लाटून घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more