विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि त्याचा फायदा पक्षाला कर्नाटक निवडणुकीत मिळाला. आता अशी बातमी आहे की, राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात.Rahul Gandhi will soon start ‘Bharat Jodo Yatra-2’?
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो.
याआधी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी १३ नोव्हेंबरला भोपाळमध्ये पदयात्रा काढणार आहेत. सध्या राहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर असून त्यांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App