वृत्तसंस्था
हैदराबाद : 17 सप्टेंबर रोजी हैदराबादच्या रंगारेड्डी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, बीआरएस सरकार 100 दिवसांच्या आत येथून पायउतार होणार. हे कोणीही रोखू शकत नाही. मग भाजपची इच्छा असो वा मग ओवेसींच्या पक्षाची इच्छा असो. ते हे बदलू शकत नाहीत. Rahul Gandhi said- BRS government will be removed from Telangana in 100 days
राहुल यांनी तेलंगणातील जनतेला 6 आश्वासने म्हणजेच गॅरंटी दिल्या. ते म्हणाले, राज्यात आमचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा 2500 रुपये दिले जातील. गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळेल. याशिवाय महिलांसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला 200 युनिट मोफत वीज देण्यात येईल.
भाजप, बीआरएस आणि एमआयएमआयएम वेगळे नसून ते एकच आहेत
राजकारणात आपण कोणाशी लढतोय हे कळणे खूप महत्त्वाचे असते. तेलंगणात काँग्रेस पक्ष केवळ बीआरएसशीच लढत नाही, तर आम्ही बीआरएस, भाजप, एमआयएमआयएम यांच्याशी लढत आहोत. हे पक्ष स्वतःला वेगळे म्हणवत असले तरी प्रत्यक्षात ते एकच आहेत. जेव्हा-जेव्हा भाजपला गरज होती, तेव्हा BRS ने पाठिंबा दिला आहे. मग तो शेतकऱ्यांच्या बिलाचा मुद्दा असो वा जीएसटी.
आम्ही तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला
सोनिया गांधी जे बोलतात ते पूर्ण करतात. 2004 मध्ये सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, आम्ही तेलंगणाचा विचार करू आणि त्यांनी जे सांगितले तेच केले. तुमचे स्वप्न, तेलंगणा राज्याचे स्वप्न सोनियाजींनी पूर्ण केले.
बीआरएसला आपण भाजप संबंध समिती म्हणतो. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला याचा पुरेपूर फायदा होतो. आम्ही केसीआरच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला नाही, तर गरीब आणि मजुरांसाठी दिला.
आपल्या भाषणात सोनिया गांधी यांनी सरकार स्थापन झाल्यास राज्यातील जनतेला हीच गॅरंटी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले. अशोक गेहलोत म्हणाले की, काँग्रेस सरकारनेच तेलंगणाला वेगळ्या राज्याचा दर्जा दिला.
त्याचवेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मते मिळविण्यासाठी खोटे बोलतात. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तुमच्या खात्यात पैसे आले का?
तत्पूर्वी येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी 14 कलमी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. वर्षअखेरीस 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणामध्ये वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, निवडणूक राज्यांच्या अध्यक्षांनीही बैठकीत सादरीकरण केले. यामध्ये निवडणुकीची रणनीती, प्रचार आणि तयारी स्पष्ट करण्यात आली.
देशातील जनतेला परिवर्तन हवे असून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्ण तयारी असल्याचे या ठरावात म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था, स्वातंत्र्य, सामाजिक-आर्थिक आणि समानता याबाबत जनतेच्या अपेक्षा पक्ष पूर्ण करेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App