अमृता शेरगिलच्या पेंटिंगचा 61.8 कोटींना लिलाव; रझांचे रेकॉर्ड तोडले!!

Amrita Shergill's painting auctioned for 61.8 crores

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रख्यात भारतीय चित्रकार अमृता शेरगिल यांच्या पेंटिंगचा तब्बल 61.8 कोटी रुपयांचा लिलाव झाला आहे. दुसरे भारतीय चित्रकार एच. एस. रझा यांचे रेकॉर्ड शेरगिल यांच्या पेंटिंगने मोडले आहे. “द स्टोरी टेलर” नामक हे पेंटिंग अमृता शेरगिल यांनी 1937 मध्ये साकारले होते. सॅफ्रन आर्ट लिलाव केंद्राने हे पेंटिंग तब्बल 61.8 कोटी रुपयांना विकले. Amrita Shergill’s painting auctioned for 61.8 crores

या आधी भारतीय चित्रकार एच एस रझा यांच्या जीई स्टेशन या पेंटिंगला लिलावात 51. 75 कोटी रुपये मिळाले होते, तर अमृता शेरगील यांच्या “इन द लेडीज एनक्लोजर” या पेंटिंगला दोनच वर्षांपूर्वी 37.8 कोटी रुपये मिळाले होते. हे पेंटिंग देखील सॅफ्रन आर्ट लिलाव केंद्रानेच विकले होते.

अमृता शेरगिल भारतीय पिता उमराव सिंह शेरगिल आणि हंगेरियन माता मेरी एंटनी गोट्समन यांच्या कन्या होत. भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात अवघी 28 वर्षे जीवन लाभलेल्या अमृता शेरगिल या फ्रान्सच्या पॅरिसमध्ये शिकल्या आणि नंतर वडिलांबरोबर त्या भारतात आल्या. भारतीय जीवनाशी समरस झाल्या आणि त्यांनी भारतीय जीवनशैलीशी संबंधित चित्रे रेखाटली. संगीत आणि अभिनयाची देखील त्यांना जाणकारी होती.

Amrita Shergill’s painting auctioned for 61.8 crores

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!