तिसऱ्याच षटकात सिराजने श्रीलंकेची अर्धी टीम तंबूत पाठवली.
विशेष प्रतिनिधी
ढाका : आशिया चषक 2023 चा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये सुरुवातीस श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र श्रीलंकेची फलंदाजी सुरू होताच संपुष्टात आली. कारण, भारताचा वेगवान गोलंदाज सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ कसाबसा ५० धावांचा आकडा गाठू शकला. In the final match of the Asia Cup Sri Lanka literally knelt before Sirajs bowling
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा कर्णधार शनाकाचा निर्णय तेव्हा चुकीचा सिद्ध झाला. जेव्हा बुमराहने पहिल्याच षटकात परेराला शून्यावर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर तिसऱ्याच षटकात सिराजने श्रीलंकेची अर्धी टीम तंबूत पाठवली.
सिराजने आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात चार बळी घेतले. यामध्ये पाथुम निशांक 02, सदिरा समरविक्रमा 0, चरित असलंका 0 आणि धनंजय डी सिल्वा 4 यांचा समावेश आहे. याशिवाय सिराजने मेंडिस आणि कर्णधार शनाका यांना क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजने त्याचा एकूण 7 षटकांत 21 धावा देत 6 बळी घेतले.
श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी चार फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कुसल मेंडिसने संघाकडून सर्वाधिक 17 धावा केल्या. यानंतर दासून हेमंताने नाबाद 13 धावांचे योगदान दिले. हार्दिकने तीन, तर बुमराहला एक विकेट मिळाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App