विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : महाराष्ट्राचा बाप्पा श्रीनगरच्या लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात विराजमान होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात गणरायाची मूर्ती त्या मंदिराला भेट दिली आहे. उद्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिथे गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.Maharashtra will sit in Panchmukhi Hanuman Temple in Lal Chowk, Srinagar; The Chief Minister visited the statue!!
ज्या श्रीनगरच्या लाल चौकात देशद्रोही नारे लगावले जायचे, जिथे दहशतवाद्यांच्या स्टेमगनच्या फैरींचे आवाज यायचे त्या लाल चौकात आता केवळ शांतताच नाही, तर गणेशोत्सवाचा उत्साह देखील मोठा दिसतो आहे. जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटविल्याचा हा परिणाम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी लाल चौकातल्या पंचमुखी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यांना गणेश मूर्ती भेट दिली.
24 वर्षांपासून गणेशोत्सव
लाल चौकातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्र्यांनी मराठी बांधवांच्या वतीने खास गणरायाची मूर्ती भेट म्हणून दिली. यंदा याच मूर्तीची मंडळाच्या वतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने श्रीनगरच्या लाल चौकात गणेशचतुर्थी आधीच ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा’ जयघोष ऐकायला मिळाला, तसेच यावेळी मंदिर समितीच्या वतीने अत्यंत पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more