पंतप्रधान मोदींनी जन्मदिनी देशाला दिली ‘यशोभूमी कन्वेशन सेंटर’ आणि विश्वकर्मा योजनेची भेट!

विश्वकर्मा योजनेंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय मिळणार असल्याची केली घोषणा.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. या निमित्त  त्यांना देशाला दिल्लीतील द्वारका येथे यशोभूमी कन्वेशन सेंटर आणि कारागीर व शिल्पकरांसाठी विश्वकर्मा योजनेची भेट दिली आहे. यशोभूमी कन्वेंशन सेंटरच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केले, याप्रसंगी त्यांनी अनेक कलाकार आणि शिल्पकरांना विश्वकर्मा प्रमाणपत्रही प्रदान  केले. Prime Minister Modi gifted Yashobhumi Convention Center and Vishwakarma Yojana to the country on his birthday

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. हा दिवस आपल्या पारंपारिक कारागिरांना आणि शिल्पकारांना  समर्पित आहे. मी सर्व देशवासियांना ‘विश्वकर्मा जयंती’च्या खूप खूप शुभेच्छा देतो. ते म्हणाले की आज मला देशभरातील लाखो विश्वकर्मा मित्रांशी जोडण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आशेचा नवा किरण म्हणून विश्वकर्मा योजना येत आहे.

मोदींनी घोषणा केली की या योजनेअंतर्गत विश्वकर्मा सहकाऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. या कर्जावरील व्याज अत्यल्प राहील याचीही काळजी घेण्यात आली आहे. पहिल्यांदा १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, त्याची परतफेड केल्यानंतर पुन्हा २  लाख रुपयांचे कर्ज मिळेल, अशी तरतूद सरकारने केली आहे. असे ते म्हणाले.

याचबरोबर ते म्हणाले की, आज देशात वंचितांना प्राधान्य देणारे सरकार आहे. या विश्वकर्मा  दिनी, आपण लोकसाठी आवाज उठवण्याच्या आपल्या प्रतिज्ञाचा पुनरुच्चार केला पाहिजे. आता गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दिवाळीसह अनेक सण येत आहेत. मी सर्व देशवासीयांना लोकल खरेदी करण्याचे आवाहन करेन.

Prime Minister Modi gifted Yashobhumi Convention Center and Vishwakarma Yojana to the country on his birthday

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात