वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे वाभाडे काढले आहेत.Rahul Gandhi attacks Modi government over farmers compensation issues
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. या शेतकरी आंदोलनादरम्यान जे शेतकरी मरण पावले त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीने संदर्भात मोदी सरकारची नकारात्मक भूमिका आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
राहुल गांधी म्हणाले, की केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संसदेत आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांची यादी आमच्याकडे नाही, असे सांगितले आहे. परंतु 403 शेतकऱ्यांची यादी पंजाब सरकारकडे आहे. त्यांच्या नातेवाईकांना पंजाब सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये मदत केली आहे.
त्याचबरोबर 152 शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी दिली आहे. परंतु आणखीही यादी आमच्याकडे आहे परंतु या यादीला मान्य करायला केंद्र सरकार तयार नाही. आम्ही मरण पावलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
इसके बिना माफी अधुरी
या पत्रकार परिषदेत पूर्वी एक ट्विट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेताना देशाची माफी मागितली होती. पण त्यांची माफी पूर्ण कशी होणार? ते प्रायश्चित्त कसे करणार? असे खोचक सवाल काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहेत.
… इसके बिना माफी अधुरी, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विट मधून त्यांनी पंतप्रधान मोदींवर विविध प्रश्नांच्या तोफा डागल्या आहेत.
तुम्ही माफी तर मागितलीत, पण लखीमपुर हिंसाचार यासाठी जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांना कधी काढून टाकणार? शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी आणि किती देणार? सत्याग्रहींवरचे खटले कधी मागे घेणार? पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी वर कायदा कधी आणणार?, या प्रश्नांची उत्तरे द्या ती उत्तरे दिली नाहीत तर तुमची माफी अपूर्णच राहील, असे टीकास्त्र राहुल गांधी पीएनजी आपल्या ट्विट मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोडले आहे.
जब PM ने कृषि-विरोधी क़ानून बनाने के लिए माफ़ी माँगी तो संसद में बतायें कि प्रायश्चित कैसे करेंगे- लखीमपुर मामले के मंत्री को बर्खास्त कब? शहीद किसानों को मुआवज़ा कितना-कब? सत्याग्रहियों के ख़िलाफ़ झूठे केस वापस कब? MSP पर क़ानून कब? इसके बिना माफ़ी अधूरी! #FarmLaws
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App