अयोध्येत जाऊन राम दर्शन घेणाऱ्या राधिका खेडांना छत्तीसगडच्या काँग्रेस मुख्यालयात शिवीगाळ, छेडछाड, गैरवर्तन!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतल्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी ट्रोल केलेल्या राधिका खेड़ा यांना छत्तीसगडच्या काँग्रेस मुख्यालयामध्ये किती भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले, याचे वर्णन त्यांनी एका पत्रकार परिषदेत केले. राधिका खेड्यांनी काँग्रेसची सगळी पदे सोडून दिली पक्षाचा राजीनामा दिला. Radhika Kheda, who went to Ayodhya to have Ram Darshan, was abused at Congress headquarters in Chhattisgarh.

छत्तीसगड मुख्यालयातल्या भयानक अनुभवाबद्दल बोलताना राधिका खेडा म्हणाल्या, 30 एप्रिल रोजी मी छत्तीसगड काँग्रेसचे मीडिया प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांच्याशी बोलायला गेले, पण त्यांनी मला अचानक शिवीगाळ करायला सुरुवात केली. माझ्याशी गैरवर्तन केले. ज्या काँग्रेसच्या मुख्यालयात मी नेहमी येऊन काम करायचे, तिथेच मला अशी शिवीगाळ सहन करायला लागल्याने मी घाबरले. मी खूप ओरडले. तिथल्या लोकांनाही ओरडून लोकांना सांगितले की खाली जा आणि महासचिवांना फोन करा पण शुक्लांच्या केबिन मधून कोणीही हलले नाही.

त्यानंतर मी फोन काढला आणि मी तुमचे रेकॉर्डिंग करते असे सांगताच सुशील आनंद शुक्ला यांनी हातवारे करून खोलीतल्या दोघांना दरवाजा बंद करायला सांगितला. त्यांनी खोली अजून बंद केली तिला कडी लावली आणि मला सतत शुक्ला शिवीगाळ करत राहिले. मी घाबरले माझ्या ब्लड प्रेशर वाटले मला त्यांची शिवीगाळ सहन झाली नाही त्यामुळे मी माझी सगळी ताकद एकवटून केबिनचा दरवाजा ढकलून कडी तोडून बाहेर आले आणि प्रदेश सरचिटणीसांच्य केबिनमध्ये गेले. पण त्यांनी तिथे मला अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट ते बूट काढून शांतपणे त्यांच्या खुर्चीवर बसून राहिले होते. ना त्यांनी शुक्लांना बोलावले, ना त्यांच्याबरोबरच्या दोघा लोकांना बोलावले त्यांच्या दृष्टीने एका महिलेला शिवीगाळ झाली ही फारच किरकोळ गोष्ट होती, असा धक्कादायक खुलासा राधिका खेडा यांनी केला.

Radhika Kheda, who went to Ayodhya to have Ram Darshan, was abused at Congress headquarters in Chhattisgarh.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात