विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणुकांबरोबरच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचीही चर्चा सुरू झाली आहे. सध्याचे महामहिम राम नाथ कोविंद यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने नवे नाव कोणते असेल, याबाबत विविध मतप्रवाह आहेत. त्यापैकी काही प्रमुख नावांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. छत्तीसगढच्या राज्यपाल अनुस्युया उईके, केरळचे राज्यपाल अरीफ महंमद खान, उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू किंवा लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्याबद्दल सर्वाधिक चर्चा आहे.Race for Raisina Hills began, Who will become next President of India?
मात्र, सर्वांनाच धक्का देणे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता खेळ असल्याने त्यांच्या पोतडीतून ऐनवेळी कोणाचे नाव निघेल, याबद्दल सगळेच जण अंधारात चाचपडत आहेत. अशा अनपेक्षित नावांमध्ये नागालंडचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते एस.सी. जमीर, भाजपचे ज्येष्ठ नेते- माजी राज्यपाल राम नाईक, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि अगदी राजनाथसिंह यांच्यादेखील नावाची कुजबूज आहे..
https://youtu.be/IPGM14XvruU
यापैकी प्रमुख दावेदारांची माहिती पुढीलप्रमाणे –
१. अनुस्यूया उईके (मध्य प्रदेश)
२. डाॅ. अरीफ महंमद खान (मध्य प्रदेश / उत्तर प्रदेश)
३. व्यकंय्या नायडू (आंध्र प्रदेश)
४. सुमित्रा महाजन (मध्य प्रदेश)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App