वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लँड फॉर जॉब्स प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने राबडी देवी, मिसा भारती आणि हेमा यादव यांना पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने तिघांनाही एक लाख रुपयांचा जातमुचलका भरण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे.Rabri Devi, Hema and Misa granted bail in Land for Jobs case; The Delhi court asked to pay a bond of Rs
राबडी देवी, मिसा भारती आणि हेमा यांच्यासोबतच न्यायालयाने हृदयानंद यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश विशाल गोगणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. मीसा भारती व्हीलचेअरवर बसून कोर्टात पोहोचल्या.
ईडीने कोर्टात 4751 पानांचे आरोपपत्र दाखल केले. यानंतर न्यायालयाने नोटीस बजावून ईडीकडून उत्तर मागितले आहे.
बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर, RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या लँड फॉर जॉब मुद्द्यावरून अडचणी वाढत आहेत. ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणांची लालू कुटुंबावर पकड घट्ट होत चालली आहे.
29 जानेवारीला ईडीने लालू प्रसाद यादव यांची 10 तास चौकशी केली, तर 30 जानेवारीला ईडीने माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सुमारे 8 तास चौकशी केली.
यापूर्वी, तेजस्वी यादव यांनी 22 डिसेंबर आणि 5 जानेवारी रोजी ईडीच्या दोन समन्सकडे दुर्लक्ष केले होते. पण, सरकार जाताच तिसऱ्या समन्सवर ते 30 जानेवारीला पाटणा येथील ईडी कार्यालयात पोहोचले. या प्रकरणी ईडीने तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय अमित कात्याल आणि लालूंचे ओएसडी भोला यादव यांना अटक केली आहे.
भोला यादव सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यासोबतच लालू यादव, तेजस्वी, राबडी, मिसा हे तिघेही जामिनावर आहेत. या प्रकरणाची सुनावणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात सुरू आहे. अशा स्थितीत लालू कुटुंबियांनाही या प्रकरणात अटक होऊ शकते की काय, अशी भीती लोकांच्या मनात सतत वाढत आहे.
काय आहे लँड फॉर जॉब्स प्रकरण?
लालू प्रसाद यादव यूपीए-1 सरकारमध्ये (2004 ते 2009) रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या ग्रुप-डीमध्ये 7 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. या नोकरीच्या बदल्यात त्याच्याकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी करण्यात आली. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात जमीन बेकायदेशीरपणे आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, लालू यादव यांच्या कुटुंबाने पाटणा आणि बिहता येथे 1 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त जमीन 7 उमेदवारांकडून अवघ्या 26 लाख रुपयांमध्ये विकत घेतली. त्यावेळच्या सर्कल रेटनुसार जमिनीची किंमत सुमारे 4.39 कोटी रुपये होती. विशेष म्हणजे जमीन हस्तांतरणाच्या बहुतांश प्रकरणांमध्ये जमीन मालकाला रोखीने मोबदला दिला जात होता. हा सगळा खेळ गिफ्ट आणि सेल डीडमधून खेळला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App