Apple Store : Apple’s iPhone 16 साठी मुंबईत 21 तासांपासून Apple स्टोअर समोर रांगा!!

Apple Store

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई – पुण्यात गणपती दर्शनासाठी, पंढरपूरात विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा ही नित्याची बाब आहे. आवडत्या शाळां मधल्या प्रवेशासाठी पालकांच्या रांगा हा देखील बातम्यांचा विषय होऊन बरीच वर्षे झाली. पण ऑनलाइनच्या जमान्यात मोबाईल फोन साठी लांबलचक रांगा या बातम्या मात्र तुलनेने नव्या आहेत.



मुंबईत बीकेसी मधल्या देशातल्या पहिल्या ॲपल स्टोअर ( Apple Store) समोर Apple’s iPhone 16 सिरीज मधल्या फोनसाठी तब्बल 21 तासांपासून रांगा लागल्या आहेत. ॲपल ब्रँडचा हा करिष्मा आहेच, पण त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानाच्या वेगातून त्याकडे ओढल्या जाणाऱ्या तरुणाईची देखील क्रेझ कशी वाढली आहे, त्याचेही हे निदर्शक आहे.

मुंबईतला रुपल शहा हा विद्यार्थी गेल्या वर्षी ॲपल स्टोअर समोर 17 तास रांगेत उभा होता. यावर्षी स्टोअर मध्ये सगळ्यात पहिला प्रवेश मिळावा यासाठी तो 21 तास उभा आहे, असे त्यांनी स्वतःच सांगितले.

Queue in front of Apple Store in Mumbai for 21 hours for Apple’s iPhone 16!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात