भाजपमध्ये व्यक्तीच्या टीम नसतात, मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीचा प्रश्नच नाही; पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण


प्रतिनिधी

मुंबई – भाजपमध्ये कोणा व्यक्तीच्या टीम नसतात. जे काही असते, ते पक्षाचे असते. त्यामुळे पत्रकार म्हणतात, त्याप्रमाणे टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण हे मला माहिती नाही. कारण हे भाजपाला मान्य नाही. भाजपाला देश प्रथम, नंतर राष्ट्र आणि नंतर आपण. भाजपात मीपणा मान्यच नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी केंद्रात प्रीतम मुंडेंना मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज नसल्याचे स्पष्ट केले. Pritam Munde and I never demanded anything (Ministerial Berth). I have no differences with those who have taken the oath as they are also the followers of Gopinath Munde:

भाजपमध्ये आपण, आम्ही असे म्हणणे मान्य आहे. त्यामुळे अशी कोणती टीम असणं पक्षाला मान्य असेल असं वाटत नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराच्या वेळी प्रीतम मुंडे यांचे नाव होते, पण प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. त्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, की आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावरून मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचे कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणे कर्तव्य आहे.

मी भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी बोलले होते. त्यांना आदल्या दिवशी मेसेज आल्याने ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्याने त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी पंकजा मुंडेंनी ट्वीट केले म्हणून प्रीतम मुंडेंचे मंत्रीपद गेले असे म्हटलं असले तरी ते हास्यास्पद आहे, असे त्या म्हणाल्या.

रात्री १२.३० वाजता भागवत कराड यांचा फोन आला होता. भाजप मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो आहे अशी माहिती त्यांनी दिली होती असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. माझे लोकांशी नाते आहे, संबंध नाही. नाते कधीच तुटत नाही पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचे प्रेम असल्याने ते व्यक्त होत असतात, असे त्यांनी सांगितले.

मुंडेना पर्याय म्हणून कराडांना पुढे केले जातेय का? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, मी राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून आले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर बिखरलेल्या संतप्त समाजाला एका ठिकाणी आणणे माझ्यासाठी आव्हान होते. मुंडेंनी बसवलेली घडी विस्कटू नये माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्यातील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभी आहे.

Pritam Munde and I never demanded anything (Ministerial Berth). I have no differences with those who have taken the oath as they are also the followers of Gopinath Munde:

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात