आपल्या घरात आपण अनेक विदेशी वस्तू दैनंदिन जीवनात वापरत आहोत. याबाबत घरातील व्यक्तींनी एकत्रित बसून अशा वस्तुबाबत यादी बनवली पाहिजे. यातून किती विदेशी वस्तू आपल्या घरात शिरल्या आहे ही बाब प्रत्येकाला समजून येईल. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नव उद्योजकांना उभारी मिळेल त्यासाठी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर द्या,असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले. Prime Minister Narendra Modi’s belief in uplifting new entrepreneurs if indigenous market becomes available
विशेष प्रतिनिधी
पुणे :आपल्या घरात आपण अनेक विदेशी वस्तू दैनंदिन जीवनात वापरत आहोत. याबाबत घरातील व्यक्तींनी एकत्रित बसून अशा वस्तुबाबत यादी बनवली पाहिजे. यातून किती विदेशी वस्तू आपल्या घरात शिरल्या आहे ही बाब प्रत्येकाला समजून येईल. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नव उद्योजकांना उभारी मिळेल त्यासाठी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर द्या,असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने जीतो कनेक्ट 2022 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे आभासी उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नुकतेच मी युरोप मधील देशात भ्रमण करून आलो असून अनेक लोकांशी विकासाबाबत चर्चा केली. जगभरातील भारतीय लोकांच्यात नवीन विश्वास, आशावाद दिसून येतो आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीने जग भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहे.
PM Narendra Modi : चक्क मराठीतून पंतप्रधान म्हणाले ‘गणेशोत्सवाच्या शुभेच्छा…’
वैश्विक कल्याणच्या दृष्टीने भारत पुढे जात असून नवीन भारत हा सर्वांना जोडणारा आहे. देश बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान यात पुढे जात असून दररोज अनेक स्टार्ट अप नोंदणीकृत होत आहे. देशातील कर व्यवस्था पारदर्शक, ऑनलाईन होत असून ‘वन नेशन, वन टॅक्स ‘ याबाबतचे लक्ष्य पूर्ण केले जात आहे. उत्पादनांना प्रोत्सहित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून सरकारी व्यवस्थेत पारदर्शकता आणली जात आहे. दुर्गम भागातील उत्पादक, बचत गट त्यांचे उत्पादन थेट सरकारला ऑनलाईन विक्री करू शकत आहे ही व्यवस्था निर्माण झाली आहे. सरकारी पोर्टलवर सुमारे ४० लाख उत्पादकांनी त्यांची नोंदणी केली असून त्यातील दहा लाख लोक मागील पाच महिन्यात जोडले गेले आहे यातून नवीन व्यवस्थेवर लोकांचा विश्वास दिसून येतो आहे. या क्षेत्रात जैन उद्योजकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. सरकारची इच्छा आणि जनतेचे पाठबळ असेल तर कोणताही बदल शक्य आहे ही बाब यातून स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भविष्यात देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने वाटचाल कारवायाची आहे. जीतो सदस्यांवर यादृष्टीने महत्वपूर्ण जबाबदारी असून युवा जैन समाज यात भरीव कामगिरी करू शकतो. जीतो संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे काम समाजात समोर येत आहे. शिक्षण, आरोग्य, कल्याणकारी योजना यात जैन संस्थेने नेहमीच भरीव काम करून इतरांना प्रोत्साहित केले आहे. आता समाजाकडून अपेक्षा आहे की, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहित करून निर्यात उत्पादनाचे नवीन मार्ग शोधून त्यावर काम करावे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App