ममता बॅनर्जी अफवा पसरवित आहेत, कोरोनाच्या लाटेनंतर सीएए लागू होणारच, अमित शाह यांनी ठणकावले

कोरोना महामारी संपुष्टात येताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार आहे. सीएए लागू होणार नाही याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अफवा पसरवित आहेत, असेही शाह यांनी सांगितले.Mamata Banerjee is spreading rumors, CAA will be implemented after Corona wave, Amit Shah insists


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : कोरोना महामारी संपुष्टात येताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार आहे. सीएए लागू होणार नाही याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अफवा पसरवित आहेत, असेही शाह यांनी सांगितले.

सिलिगुड रेल्वे स्पोर्ट मैदानावर आयोजित सभेत बोलताना शाह म्हणाले, सीएएची अंमलबजावणी होणार नसल्याची अफवा तृणमूलतर्फे पसरवली जात आहे. पण, कोरोनाची लाट संपल्यानंतर तत्काळ या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. सीएए वास्तविकता असून, ती राहणार. भाजप बंगालची घुसखोरीची समस्या निकाली काढेल.


Yogi – Mamata : योगी – ममता या दोघांची राजवट सारखीच वाईट; अधीर रंजन चौधरींचा निशाणा


शाह म्हणाले, ममता तिसºयांदा विजयी झाल्यामुळे त्या सुधारतील असे आम्हाला वाटले होत्या. पण, त्या सुधारल्या नाही. त्यामुळे जोपर्यंत त्या बंगाली जनतेवरील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, गुन्हेगारी संपवार नाहीत, तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही. निवडणुकीनंतर बंगालमध्ये झालेला हिंसाचार पासून मानवाधिकार संघटनेनेही येथे कायद्याचे राज्य नव्हे तर सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत 2 वर्षे जनतेला मोफत अन्नधान्य दिले. पण, ममतांनी त्यात आपला फोटो लावला. गोरखपूरहून सिलीगुडीपर्यंत 31 हजार कोटी रुपयांच्या 545 किमी लांबीच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. ‘देशात सर्वाधिक वीज दर बंगालमध्ये आहेत. देशात बंगालमध्ये पेट्रोल 115 रुपये प्रतिलीटर दराने विकले जाते. याऊलट भाजपचे सरकार असलेल्या राज्यांत पेट्रोल 105 रुपये दराने मिळते.

आजही येथील नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत नाही. ममतांनी बंगालला आर्थिकदृष्ट्या कंगाल केले. 1947 मध्ये देशाच्या जीडीपीत बंगालचा वाटा 30 टक्के होता. तो 2022 मध्ये घसरुन 3.3 टक्यांवर आला आहे. ममता या प्रश्नाचे उत्तर बंगाली जनतेला देणार काय? असा सवालही शाह यांनी केला.

Mamata Banerjee is spreading rumors, CAA will be implemented after Corona wave, Amit Shah insists

महत्वाच्या बातम्या