Yogi – Mamata : योगी – ममता या दोघांची राजवट सारखीच वाईट; अधीर रंजन चौधरींचा निशाणा


वृत्तसंस्था

कोलकाता : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन्ही नेत्यांची राजवट सारखीच वाईट आहे. कारण दोघांनाही आपापल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे जमलेले नाही, असा निशाणा काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी साधला आहे.Yogi – Mamata: The rule of both Yogi and Mamata is equally bad; Impatient Ranjan Chowdhury’s target

पश्चिम बंगाल मधील हंसखली मध्ये लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांनी नीट हाताळले नाही. शेवटी सीबीआय कडे चौकशी सोपवावी लागली. या मुद्द्यावरून अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी सरकारला घेरले आहे.अधीर रंजन चौधरी म्हणाले, की ममता बॅनर्जी म्हणतात की मी पश्चिम बंगालमध्ये हाथरस किंवा उन्नाव सारख्या घटना होऊ देणार नाही. पण बंगालच्या नदिया जिल्ह्यातील हंसखली मध्ये लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाली. पोलीसांनी हे प्रकरण नीट हाताळले नाही. खुद्द ममतांनी पोलीसांचा हलगर्जीपणा बद्दल दोष दिला. अधिकाऱ्यांना झापले. पण यातूनच हे सिद्ध होते की ममता बॅनर्जी यांची राजवट योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीपेक्षा काही वेगळी नाही. बंगाल मधली राजवट देखील उत्तर प्रदेशातील राजवटीएवढीच वाईट आहे. दोन्ही नेत्यांना आपापल्या राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्था नीट सांभाळता आलेली नाही.

हंसखलीत लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह आश्रमात सापडला. पोलिसांनी चौघांना अटक केली त्यानंतर सीबीआयने तिघांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणाचे रहस्य कायम आहे

Yogi – Mamata: The rule of both Yogi and Mamata is equally bad; Impatient Ranjan Chowdhury’s target

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”