विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासारखे हुकुमशहा असल्याचे शरसंधान साधले होते. त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत चांगलाच समाचार घेतला. Prime Minister Modi’s tough question to Pawar!!
शरद पवार गेल्या कित्येक दशकांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. म्हणून त्यांचा सरकारने पद्मविभूषण किताब देऊन सन्मान केला, पण जर मोदी सरकार हे “पुतीन” सरकार असेल तर त्यांनी तो किताब घेतलाच कशाला??, पण तो किताब घेऊन ते तर सन्मान झाल्याचे मानत आहेत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे वाभाडे काढले.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार यांचे पक्ष फुटल्याने त्या दोन्ही नेत्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे का??, असा प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, कोणत्याही नेत्याच्या घरातल्या झगड्यामुळे त्याच्या बाजूने सहानुभूतीची लाट जात नाही. लोक म्हणतात, तुमच्या घरातला झगडा तुम्ही घरातच निपटा, तो बाहेर कशाला आणता?? पण पवार आणि ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याची खोटी बातमी पसरवण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे.
वास्तविक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या कौटुंबिक झगड्यांमुळेच त्यांचे पक्ष फुटले. आपापल्या पक्षातले सक्षम नेते पवार आणि ठाकरेंनी निवडले नाहीत. त्यांच्या ऐवजी आपल्याच मुलांना प्राधान्य दिले म्हणून तर त्यांच्याभोवतीचे नेते नाराज होऊन बाहेर पडले. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही त्यांना जवळ केले. पण ठाकरे आणि पवारांच्या कौटुंबिक झगड्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संताप आहे. सहानुभूतीची लाट तर अजिबात नाही. उलट भाजपने आमदारांचे संख्याबळ जास्त असताना देखील मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि कमी आमदार संख्या असलेले एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. याबद्दल सहानुभूतीची लाट भाजपच्या बाजूने आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App