सनातन वादाबाबत पंतप्रधान मोदींचे प्रथमच भाष्य; I.N.D.I.A आघाडीवर मध्य प्रदेशातून घणाघात!!

विशेष प्रतिनिधी

बिना : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, कोरोना अशी नावे ठेवून त्याची बदनामी केल्यानंतर संपूर्ण देशभर संताप उसळला. स्वतः स्टालिन यांना आपण हिंदू मंदिरांची कशी डागडूजी केली, त्यासाठी 650 कोटी रुपये खर्च केले हे सांगावे लागले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच भाष्य केले आहे. Prime Minister Modi’s First Commentary on the Sanatan Controversy

मध्य प्रदेशातील बिना येथे रिफायनरीच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी I.N.D.I.A आघाडीवर घणाघती टीका केली. मूळात I.N.D.I.A आघाडीची स्थापनाच मुळी सनातन धर्म नष्ट करण्यासाठी झाली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ज्या सनातन धर्माने स्वामी विवेकानंद यांच्यासारखे महापुरुष आणि लोकमान्य टिळकांसारखे राष्ट्रपुरुष यांना प्रेरणा दिली, तो सनातन धर्म I.N.D.I.A आघाडीला संपायचा आहे. सनातन धर्माच्या प्रेरणेतूनच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून त्या राष्ट्रीय उत्सवाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी जोडून घेतले. ज्या सनातन धर्माला महात्मा गांधींनी आपल्या जीवनाचा आधार मानला त्यांच्या मुखातले अखेरचे शब्द होते हे राम!! हा सनातन धर्म महर्षी वाल्मिकी, माता शबरी यांनी वाढवला फुलवला. तो सनातन धर्म I.N.D.I.A नावाच्या घमंडिया आघाडीला तोडायचा आहे. संपवायचा आहे. त्यामुळे या देशातील सर्व सनातनधर्मीय अनुयायांनी सावध राहावे. या देशावर आपल्या सर्वांचेच प्रेम आहे. पण आज त्यांचा सनातन धर्मावर हल्ला आहे. उद्या ते देशाचाही असाच घात करतील अशी घणाघाती टीका मोदींनी केली.

I.N.D.I.A आघाडीच्या तीन मोठ्या बैठका पार पडल्यानंतर काल शरद पवारांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्या महारॅलीचे स्थान मध्य प्रदेशातील भोपाळ निश्चित करण्यात आले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ मध्ये आघाडीची पहिली महारॅली होईल. पण त्याआधीच मोदींनी मध्य प्रदेशात येऊन सनातन धर्माच्या मुद्द्यावर आघाडीला ठोकून काढले आहे.

Prime Minister Modi’s First Commentary on the Sanatan Controversy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात