पंतप्रधान मोदी तिसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच मॉस्कोला भेट देणार!

भारत आणि रशिया यांच्यातील परस्पर संबंधांसाठी ही भेट विशेष मानली जात आहे. ५ वर्षांनी मोदी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच सोमवारी रशियाला जाणार आहेत. दौऱ्यापूर्वी मॉस्कोने जारी केलेल्या निवेदनानुसार, रशिया ‘अत्यंत महत्त्वाच्या भेटी’बद्दल खूप उत्सुक आहे. भारत आणि रशिया यांच्यातील परस्पर संबंधांसाठी ही भेट विशेष मानली जात आहे. तब्बल ५ वर्षांनी पंतप्रधान रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.Prime Minister Modi will visit Moscow for the first time in his third tenure

मोदी मॉस्कोला जाण्यापूर्वीच, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शनिवारी हे सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी २२व्या भारत आणि रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ते ८ आणि ९ जुलै रोजी रशियाची राजधानी मॉस्को येथे असतील.



या उच्चस्तरीय भेटीची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी नवी दिल्लीत दिली. दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचाही विचार केला जाईल.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते विशेष कार्यक्रमांसह मॉस्कोमध्ये अनौपचारिक चर्चेत भाग घेतील. ते म्हणाले की, फार व्यस्त नाही म्हटले तरी अजेंडा सर्वसमावेशक असणार आहे. पंतप्रधान मोदींचा हा अधिकृत दौरा असणार आहे. त्यांना आशा आहे की दोन्ही नेते अनौपचारिकपणे देखील बोलू शकतील. पेस्कोव्ह यांच्या मते, भारत आणि रशियामधील संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर जाणार आहेत. क्रेमलिनमध्ये समोरासमोर चर्चेसह शिष्टमंडळांमधील बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी २०१९ मध्ये रशियाला भेट दिली होती. त्यावेळी मोदी व्लादिवोस्तोक येथे एका आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. आत्तापर्यंत भारत आणि रशियामध्ये एकामागून एक २१ वार्षिक शिखर परिषदा आयोजित केल्या गेल्या आहेत. वार्षिक शिखर परिषद शेवटची ६ डिसेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले.

Prime Minister Modi will visit Moscow for the first time in his third tenure

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात