विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. Prime Minister Modi will hold a meeting with the Chief Minister today
त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, बुधवारी दुपारी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे या बैठकीत सादरीकरण करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू पुन्हा वाढू लागले आहेत. रविवारी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी लोकांना कोविडशी संबंधित खबरदारीचे पालन करत राहण्याचे आवाहन केले होते.
या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या मंत्रालयातील अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी देशात एकाच दिवसात कोविडच्या २,४८३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या वाढून ४३०६२५६९ झाली आहे. त्याचबरोबर उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ हजार ६३६ इतकी कमी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App