हिंदू मतदारांवर चालून आलेली “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्वाची संक्रांत!!


सध्या देशभरात सावरकर प्रणित हिंदुत्वाची राजकीय चलती सुरू असताना महाराष्ट्रात मात्र या हिंदुत्वाने “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्वाचे दुर्दैवी वळण घेतले आहे. किंबहुना ही “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्वाची संक्रांत हिंदू मतदारांवर चालून येताना दिसते आहे…!! हेच ते हिंदू मतदार आहेत, ज्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि मित्र पक्षांच्या महायुतीला मतदान करून बहुमत दिले होते. पण हे बहुमत हिंदुत्ववादी शिवसेना आणि भाजप यांना पचले नाही. त्यांनी आपापसात भांडून हिंदुत्वाची “गदाधारी” आणि “गधास्वारी” अशी वाटणी करून टाकून हिंदू मतदारांवर संक्रांत आणली आहे…!!
While the political movement of Savarkar Pranit Hindutva was going on in Maharashtra

ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या नेतृत्वाने रक्ताचे पाणी केले. छद्म धर्मनिरपेक्षतेच्या वळणावरून महाराष्ट्राचे राजकारण हिंदुत्वाच्या निर्णायक वळणावर आणून ठेवले, त्या हिंदुत्वाची या दोन्ही पक्षांच्या “अनुयायी नेत्यांनी” अक्षरशः माती केली आहे…!! महाराष्ट्राचे राजकारण हिंदुत्वाच्या निर्णायक वळणावर आणून ठेवण्यामध्ये आज दोन्ही पक्षांच्या महाराष्ट्रातील सध्याच्या एकाही राजकीय नेत्याचे कर्तृत्व नाही. ना हे कर्तृत्व उद्धव ठाकरे यांचे आहे… ना देवेंद्र फडणवीस यांचे…!! हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या पूर्वपुण्याईवर स्वतःच्या हिंदुत्वाच्या व्याख्येच्या फैरी हिंदू मतदारांवर सोडत आहेत…!!

उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व घंटाधारी नाही. ते गदाधारी आहे… पण ते सिल्वर ओकच्या दारात जाऊन पडले आहे…!! हे उद्धव ठाकरे यांना दिसणार नाही. कारण त्यांच्या डोळ्यावर मुख्यमंत्रीपदाचे पडळ आले आहे. त्यांचे गदाधारी हिंदुत्व शिवसेनेच्या आमदारांच्या निधीसाठी राष्ट्रवादीच्या डोक्यावरून फिरत नाही. राष्ट्रवादीच्या डोक्यावर हाणायला गेली की उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाची गदा जत्रेत मिळणाऱ्या प्लास्टिकच्या गदेसारखी होते…!! शिवसैनिकांनाही यातले वास्तव दिसते. पण त्यांना ते बोलता येत नाही…!!

जे उद्धव ठाकरे यांचे तेच देवेंद्र फडणवीस यांचे. शिवसेनेने सारखा एक मोठा हिंदुत्ववादी फोर्स केवळ मुख्यमंत्रिपदापाई भाजपपासून दूर गेल्याने तो राष्ट्रवादी सारख्या कावेबाज पक्षाच्या जाळ्यात सापडतो आहे. शिवसैनिकांची त्याही पेक्षा हिंदू मतदाराची प्रचंड घुसमट होते आहे, हे फडणवीसांना दिसत नाही का…?? फडणवीसांच्या पक्षाने तरी महाराष्ट्रात असे कोणते कर्तृत्व दाखवले की त्यांच्याकडे बघून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केले आहे…?? महाराष्ट्रात हिंदुत्वाची पताका बाळासाहेब ठाकरेंनी फडकत ठेवली. त्यांनी हिमतीने ती पुढे नेली ही वस्तुस्थिती नाही का…?? ती हिंमत ना त्यावेळच्या प्रमोद महाजनांना दाखवता आली… ना गोपीनाथ मुंडे यांना… पण या दोन नेत्यांएवढी देखील क्षमता आजच्या भाजपच्या नेत्यांमध्ये नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनात शिवसेनेच्या हिंदुत्वाला “गधास्वारी हिंदुत्व” म्हणून हिणवले. पण हे कर्तृत्व गुजरात मधल्या दिल्लीत जाऊन पोहोचलेल्या अमित शहांनी दाखवले…!! महाराष्ट्रातल्या फडणवीसांनी, मुंडेंनी, मुनगंटीवार यांनी दाखवलेले नाही…!! ही वस्तुस्थिती आहे… ती नाकारण्यात काय मतलब आहे…??

शिवसेना काय किंवा भाजपा काय दोन्ही पक्षांच्या आजच्या नेतृत्वाचे पाय खऱ्या अर्थाने मातीचेच आहेत. त्यांचे कर्तृत्व आपल्या पूर्वसुरी नेत्यांएवढे अजिबात उत्तुंग नाही. दुसऱ्यांच्या जीवावर किंबहुना आपल्या राजकीय पूर्वजांच्या जीवावर ते उड्या मारत आहेत आणि हिंदुत्वाला नावे ठेवत आहेत…!! हिंदुत्वाची पताका स्वतःच्या छातीवर आणि बळावर फडकवण्याची हिंमत ना उद्धव ठाकरेंमध्ये आहे… ना देवेंद्र फडणवीसांमध्ये…!! ती हिंमत आधीच्या काळात महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली आणि आता मोदी – अमित शहा दाखवत आहेत…!!

संजय राऊत यांच्यासारख्या राष्ट्रवादी प्रणित शिवसेना प्रवक्त्यांना हे दिसणार नाही. ते काड्या घालतच राहणार. पण बाकीच्या शिवसैनिकांना आणि बाकीच्या भाजपा नेत्यांना हे दिसत नसेल तर त्यांची दृष्टी तरी अधू आहे आणि डोळ्यावर महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या सत्तेच्या मस्तीचे पडळ आले आहे आणि त्यातूनच “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्वाची व्याख्या करायला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुचले आहे.

– मतदारांची घोर उपेक्षा

पण या निमित्ताने ठाकरे – फडणवीसांनी मतदारांची मात्र पूर्ण उपेक्षा केली आहे. ज्या मतदारांनी हिंदुत्व या मुद्द्यावर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना निवडून दिले, त्या मतदारांची सध्याच्या शिवसेना आणि सध्याच्या भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी गद्दारी केली आहे. आज ना उद्या ही गद्दारी त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. आज भले ते “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्व तो म्हणत असू देत हिंदू मतदारांच्या हातातली गदा त्यांच्या टाळक्यावर आपटल्याशिवाय राहणार नाही… आणि हिंदू मतदाराचे खऱ्या अर्थाने दुर्दैव असेल. “सिल्वर ओक” म्हणूनच खदाखदा हसते आहे…!!

While the political movement of Savarkar Pranit Hindutva was going on in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”