आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. Prime Minister Modi went to Ahmedabad and exercised his right to vote!
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : देशातील 18व्या लोकसभेसाठी मतदान सुरू आहे. दोन टप्प्यांनंतर आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या टप्प्यात 12 राज्यांतील 93 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये गुजरातच्या सर्व 25 जागांचा समावेश आहे.
गुजरातमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भवितव्यही ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मतदान करण्यासाठी अहमदाबादला पोहोचले. त्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. या वेळी ते काय म्हणाले ते जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ७.४५ च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. ‘मी देशवासियांना आवाहन करतो की, लोकशाहीत मतदान करणे हे साधे दान नाही. आपल्या देशात मतदानाला विशेष महत्त्व आहे. त्याच भावनेने देशवासीयांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपापल्या भागात विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी मतदान करावे.
निवडणूक प्रचार आणखी तीन आठवडे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातचा मतदार असल्याने मी येथे नियमितपणे मतदान करतो. मी काल रात्रीच अहमदाबादला आलो. येथून मी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथे जाईन. गुजरात आणि देशातील मतदारांचेही मी मनापासून आभार मानतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App